kolhapur | अजय पवार नवे अपर जिल्हाधिकारी 
कोल्हापूर

kolhapur | अजय पवार नवे अपर जिल्हाधिकारी

चव्हाण उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निकम नवे जिल्हा पुनर्वसन अधिकारी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यातील दोन पर जिल्हाधिकारी व १४ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या झाल्या. कोल्हापूरचे अपर जिल्हाधिकारीपदी अजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली. तत्कालिन अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. पवार यांनी यापूर्वी जिल्ह्यात आजरा-भुदरगड, पन्हाळ्याचे प्रांताधिकारी तसेच तहसीलदार म्हणून काम पाहिले आहे.

कोल्हापूरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांची कोल्हापूरच्याच उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून हेमंत निकम यांची नियुक्ती केली आहे.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीता गायकवाड रजेवर गेल्याने काही दिवसांपासून हे पद रिक्त होते. सध्या एसआयआर प्रक्रिया सुरू असल्याने या रिक्त जागी मोहिनी चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडेच नव्या नियुक्तीपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे. जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या निकम यांनी यापूर्वी भूसंपादन उपजिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्यात काम केले आहे.

तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा सिंघण यांची सांगलीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांची कोणत्याही पदावर नियुक्ती केलेली नसून त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात हजर व्हावे, असे आदेशात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT