aeroplane airplane Pudhari
कोल्हापूर

Kolhapur-Mumbai Indigo flight: कोल्हापूर - मुंबई दररोज विमानसेवेचा ‘टेक ऑफ’, वेळापत्रक

kolhapur mumbai flight: 29 मार्चपासून दररोज दोन उड्डाणे; वेळापत्रक जाहीर : तिकीट बुकिंगला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

  • 29 मार्चपासून इंडिगोची दररोज सकाळी व संध्याकाळी दोन सत्रांत विमानसेवा

  • नवी मुंबई विमानतळामुळे स्लॉट मिळाला

  • एका दिवसात मुंबईतील काम उरकून कोल्हापुरात परतणे शक्य

  • उद्योजक, आयटी क्षेत्र आणि परदेशी जाणार्‍या पर्यटकांची सोय

Indigo Mumbai Kolhapur flight schedule ticket price timing

कोल्हापूर : कोल्हापूरच्या औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्रासाठी 29 मार्च हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. कोल्हापूर ते मुंबई दरम्यान इंडिगो एअरलाईन्सची विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रांत सुरू होत आहे. विशेष म्हणजे, मुंबईतील जुन्या विमानतळावरील ‘स्लॉट’च्या उपलब्धतेचा तांत्रिक अडथळा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दूर झाला असून कोल्हापूरकरांचे विमान प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात येत आहे.

अनेक वर्षांपासून कोल्हापूरहून मुंबईला सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येईल, यासाठी दोन सत्रात विमानसेवेची मागणी होत होती. मात्र, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानांच्या प्रचंड गर्दीमुळे सकाळी आणि संध्याकाळी कोल्हापूरच्या विमानासाठी स्लॉट (उड्डाण व लँडिंगची वेळ) उपलब्ध होत नव्हता. नवी मुंबई विमानतळ कार्यान्वित झाल्याने हा तांत्रिक अडथळा दूर झाल्यामुळे दररोज विमानसेवेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. प्राईम स्लॉटस् उपलब्ध झाल्यामुळेच आता दिवसातून दोनदा विमान उडणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी विमानसेवा सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला होता.

व्यावसायिक आणि पर्यटनाला बूस्ट

या विमानसेवेमुळे कोल्हापूरच्या उद्योग विश्वाला मोठी चालना अपेक्षित आहे. सकाळी 8 वाजता मुंबईहून निघून सव्वानऊला कोल्हापुरात येणे आणि रात्री 8.50 ला कोल्हापूरहून निघून रात्री 10 ला मुंबईत पोहोचणे शक्य झाल्याने ‘डे ट्रिप’ करणार्‍या उद्योजकांची या विमानसेवेमुळे मोठी सोय होणार आहे.

ही सेवा म्हणजे कोल्हापूरच्या उद्योजकांसाठी बूस्टर आहे. विशेषतः परदेशातून येणार्‍या प्रवाशांना आता मुंबईत उतरल्यानंतर संध्याकाळची 8 ची फ्लाईट पकडून कोल्हापूर गाठता येईल. यामुळे ट्रॅव्हल इंडस्ट्रीसह अंबाबाई दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या वाढेल. आयटी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी कनेक्टिव्हिटी हा मोठा अडथळा होता. तो आता दूर झाला आहे.

तिकीटाचे दर किती?

इंडिगोच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, कोल्हापूर- मुंबई या मार्गावर 29 मार्च रोजीचे तिकीटांचे दर 7,666 रुपये इतके दाखवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT