कोल्हापूर : मुंबईत मराठा आंदोलकाला काहीही कमी पडू देणार नाही, असा निर्धार करत ‘लढा आरक्षणाचा, हात मदतीचा...’ अशी साद सकल मराठा समाजाने घातली. त्याला प्रतिसाद देत मुंबईतील मराठा आरक्षण लढ्यात सहभागी लाखो आंदोलकांसाठी सर्व जाती-धर्मीयांकडून उत्स्फूर्त मदतीचा अखंड ओघ सुरू झाला. सोमवारी जिल्ह्यातून ट्रक भरून साहित्य मुंबईला रवाना झाले.
पिण्याच्या पाण्याचे बॉक्स, सफरचंद, बिस्कीट, लाडू, फरसाण, भाकरीसह तांदूळ आणि पीठ सोमवारी पाठवण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे वसंतराव मुळीक, अश्विनकुमार वागळे, अजय शिंदे, चंद्रकांत पाटील, रूपेश पाटील, शशिकांत पाटील, संदीप देसाई, राहुल इंगवले, उमेश पोवार, पै. बाबा महाडिक, राजू सावंत, राजू सूर्यवंशी, निलेश चव्हाण, डॉ. संदीप पाटील, दिलीप देसाई, उदय लाड, राजू लिंग्रस, चारुलता पाटील आदी उपस्थित होते.
200 किलो चिवडा, 300 किलो फरसाण, चकली बॉक्स, 400 रेनकोट, 400 किलो सफरचंद, 100 बॉक्स बिस्किटे, 300 पाणी बॉटल बॉक्स, 1 हजार किलो तांदूळ, 300 किलो साखर, लोणचे, चपाती, भाकरी.
शिवसेना सोशल आर्मी ग्रुपतर्फे 10 हजार लाडू, 5 हजार पाणी बॉटल, प्रत्येकी 1 हजार साबण, पेस्ट व ब—श पाठविले. यावेळी विकी मोहिते, अतुल साळोखे, सरदार टिप्पे, शरद क्षीरसागर, ताराचंद संभेराव, उमेश विचारे उपस्थित होते.
श्री अंबाबाई भक्त मंडळ मोफत अन्नछत्रतर्फे मुंबईत 15 हजार आंदोलकांची आझाद मैदानासमोरील दि बॉम्बे डायेशन ट्रस्टच्या इमारतीत निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. दररोज 1600 किलो तांदूळ, 300 किलो तूरडाळीचे जेवण दिले जात आहे. आंदोलन सुरू असेपर्यंत ही व्यवस्था सुरू राहील, असे ट्रस्टचे अध्यक्ष संजय साळोखे, सौ. महेश्वरी सरनोबत व सौ. संगीता साळोखे यांनी सांगितले.
शाळा क्रमांक 9, राजारामपुरी दहावी गल्ली येथील केंद्रांवर मदत स्वीकारली जाणार आहे. व्यवस्थित पॅकिंग करून मदत जमा करा, असे आवाहन केले आहे.