पदवीचे प्रमाणपत्र स्विकारताना 80 वर्षाचे वसंत सिंघण Pudhari Photo
कोल्हापूर

वय केवळ अंक, 80व्या वर्षी घेतली एम. ए.ची पदवी!

1962 मध्ये केले होते मॅट्रिक पूर्ण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

वय हा केवळ अंक आहे, मनात शिकण्याची जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही वयात, यशाला गवसणी घालू शकता याचे चित्र शिवाजी विद्यापीठाच्या दिक्षान्त समारंभात दिसले. वसंत सिंघण या 80 वर्षांच्या विद्यार्थ्याने एम. ए.ची तर 35 वर्षे पोलिस सेवा करून वयाच्या 64 वर्षी निवृत्त पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील या विद्यार्थ्याने एल. एल. बी.ची पदवी संपादन केली.

शिवाजी विद्यापीठाचा दिक्षांत सोहळा शुक्रवारी झाला. या सोहळ्यात हजारो विद्यार्थी पदव्या घेत नव्या क्षितिजाकडे झेप घेण्यास सज्ज झाले. यामध्ये ‘या वयात शिकून काय करायचे’ असा समाजातील अनेकांचा असलेला द़ृष्टिकोन बाजूला ठेवत, ‘वय कितीही असू दे, केवळ शिकायचे आहे’, याच भावनेने आणि तितक्याच मोठ्या जिद्दीने अभ्यासक्रम पूर्ण करत पदवी घेणार्‍यांचीही संख्या होती. 80 वर्षाच्या वसंत सिंघण या आजोबांनी तेच दाखवून दिले आहे. त्यांनी इतिहासातील मास्टर ऑफ आर्टस्ची पदवी प्राप्त केली. 1962 मध्ये त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले. त्यानंतर सुमारे 60 वर्षांनंतर त्यांनी परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा दिली. शुक्रवारी त्यांनी आपल्या नातीबरोबर पदवी घेतली.

शिक्षण घेणार्‍यांना कोणतीच अडचण नसते, फक्त जिद्द असावी, असे सांगणार्‍या आर. आर. पाटील यांनी परीक्षेची 20 रुपये इतकी फीही भरण्यासारखी परिस्थिती नसताना, परीक्षा देत पोलिस उपअधीक्षक पदापर्यंत झेप घेतली. 1984 झाली बीएस्सी झाल्यानंतर 1986 साली लॉ साठी प्रवेश घेतला आणि नोकरी लागली. नोकरी करणे क्रमप्राप्त होते, यामुळे लॉ करता आला नाही, पण हे स्वप्न त्यांनी निवृत्तीनंतर वयाच्या 64 व्या वर्षी पूर्ण करत एल. एल. बी.ची पदवी संपादन केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT