कोल्हापूर

kolhapur | चांदीच्या विटांऐवजी निघाल्या 40 किलो तांब्याच्या लगडी

वादावादीनंतर थंड पेय पिताच दिवाणजीचा उद्योजकाच्या दरवाजातच मृत्यू; शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला

पुढारी वृत्तसेवा

हुपरी : सेलम (तामिळनाडू) येथून हुपरी येथील उद्योजकांना दागिने तयार करण्यासाठी दिवाणजीकडून पाठविण्यात आलेल्या चांदीच्या विटां ऐवजी 40 किलो तांब्याच्या लगडी निघाल्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीनंतर त्या दिवाणजीने थंड पेय पिताच उद्योजकाच्या दरवाजातच त्याचा मृत्यू झाला. शिवम निवास जाधव (वय 25, मूळ रा. घोटी बुद्रुक, ता. खानापूर, जि. सांगली, सध्या रा. सेलम) असे त्या दिवाणजीचे नाव आहे. शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे.

सेलमहून सोमवारी चारचाकी वाहनाने निघालेला शिवम एक दिवस उशिराने बुधवारी सकाळी हुपरीत पोहोचला. त्याने विशालनगरमधील उद्योजक आशिष अण्णासो मोरे यांना चांदीच्या विटांऐवजी 40 किलो चांदीच्या लगडी दिल्या. मोरे यांनी सेलममधील व्यावसायिकाकडे शुद्ध चांदीच्या विटा मागितल्या होत्या; पण त्यांना चांदीच्या लगडी मिळाल्या. यावरून शिवम व आशिष यांच्यात झाला. शिवमने चारचाकीतील थंड पेयाची बाटली काढून सर्वांसमक्ष प्यायला. त्यानंतर पुन्हा तो मोरे यांच्या बंगल्यात येत असतानाच चक्कर येऊन दरवाजाच्या पायरीवरच कोसळला. मोरे यांनी त्याला खासगी दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला असता उपचारापूर्वीच आशिषचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT