मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र कर्नाटक मधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापुर ता. भुदरगड येथील सद्गुरु बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रेस हजारो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला.
गुरुवार दिनांक 20 मार्च दिवशी समाधीपूजन, अभिषेक व विनापूजन देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशिलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. भंडारा यात्रेस प्रारंभ झाला. याप्रसंगी हरी भजन, धनगरी ढोल वादन असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. बाळुमामाची आरती झाली. फटाक्याची आतषबाजी झाली. भंडारा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर व कळसावर आणि भक्तनिवास येथे नेत्रदिपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज पहिल्या दिवसापासूनच नवरात्र उपवास करणारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. कार्याध्यक्षा रागीणी खडके, सचिव संदीप मगदूम, दत्तात्रय पाटील दिनकरराव कांबळे संभाजी पाटील यशवंत पाटील दिलीप पाटील, राजनंदिनी भोसले शामराव होडगे, इंद्रजीत खर्डेकर, सरपंच विजय गुरव रामांना मरेगुदरी, पुंडलिक होसमणी, बसवराज देसाई, ग्रामस्थ, भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होता.