Keshavrao Bhosale Memorial Award | अभिनेते मोहन जोशी यांना ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ जाहीर 
कोल्हापूर

Keshavrao Bhosale Memorial Award | अभिनेते मोहन जोशी यांना ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ जाहीर

४ ऑक्टोबरला होणार वितरण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना जाहीर झाला. रविवारी (दि.४ ) दुपारी साडेतीन वाजता गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिर येथे पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात प्रदीर्घ काळ आपल्या कसदार अभिनयाने स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या मोहन जोशी यांच्या कलाप्रवासाचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख ५१ हजार रुपये, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. यापूर्वी हा पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी शरद भुताडिया आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे.

राजेश दामले घेणार प्रकट मुलाखत

मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांची प्रकट मुलाखत सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले घेणार आहेत. या मुलाखतींमधून मोहन जोशी यांचा कलाप्रवास, संस्मरणीय भूमिका, रंगभूमी-चित्रपटातील अनुभव आणि ज्योती जोशी यांची त्यांच्या वाटचालीतील साथ यावर संवाद रंगणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT