पुलाची शिरोली : सांगली फाटा येथील बस स्टॉपवर जुगार खेळवणाऱ्या आणि गर्दी असल्याच्या फायदा घेत प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना शिरोली पोलिसांनी अटक केली. ऐन दिवाळी सणाच्या काळात झालेल्या या कारवाईने पोलिसांचे कौतुक होत आहे. या कारवाईत आरोपीकडून ३३९० रूपयांचा मुददेमाल जप्त केला.
सांगली फाटा येथील बस स्टॉपच्या समोर गर्दीचा फायदा घेवून दिनेश रामकृष्ण मळगावकर ( वय ४९ रा. प्लॉट नं.११ लोटस कॉलनी, गोवंडी मुंबई ) व प्रशांत दत्तात्रय दबळे,(वय.२९ रा.सिध्दार्थनगर पेठवडगांव ता.हातकणगले ) हे दोघे बेकायदेशीरपणे जुगार खेळत असताना शिरोली पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून ३३९० रूपयांचा मुददेमाल जप्त केला .