इचलकरंजीत अतिक्रमणांवर कारवाईवेळी महापालिका अधिकार्‍याची धरली गळपट Pudhari File Photo
कोल्हापूर

इचलकरंजीत अतिक्रमणांवर कारवाईवेळी महापालिका अधिकार्‍याची धरली गळपट

विरोधाला न जुमानता जेसीबीद्वारे परिसर केला मोकळा; काही काळ तणाव

पुढारी वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील गोविंदराव हायस्कूल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयासमोर अतिक्रमणे वाढली होती. याबाबत महापालिकेकडे तक्रार आली होती. त्यानुसार महापालिकेकडून गुरुवारी सकाळी कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान महापालिकेच्या अधिकार्‍याची गळपट धरण्यात आली. तसेच, अतिक्रमणधारकांकडून जीव देण्याची धमकी देण्यात आली.

शहरातील मुख्य न्यायालय परिसरात वारंवार वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर केलेल्या अतिक्रमणाबाबत महापालिकेत तक्रार अर्ज दिला होता. त्याची दखल घेत रुग्णालयासमोर असणारे मोबाईल दुकान, नाश्ता सेंटर व इतर दुकाने यांनी केलेली अतिक्रमणे आयुक्त पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार काढण्यात आली. यावेळी महापालिका कर्मचारी व अतिक्रमणधारक यांच्यात वादावादी झाली. एका अतिक्रमणधारकाने अंगावर डिझेल ओतून घेण्याची धमकी दिली. त्यामुळे जवळपास तासभर वादावादी सुरू होती. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या प्रमाणात विरोध असतानाही अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू ठेवून जेसीबीद्वारे परिसर मोकळा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT