कोल्हापूर

गडहिंग्लज येथील अभियंत्याचा पुणे येथे अपघाती मृत्यू

backup backup

पुढारी वृत्तसेवा : गडहिंग्लज येथील तरुणाचा पुणे येथे ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. कात्रज येथील नवले ब्रीजवर हा अपघात झाला.

संदेशकुमार आनंदा खेडेकर (वय 32 हाळलक्ष्मीनगर, खोराटे कॉलनी, गडहिंग्लज येथील रहिवासी) या तरुणाचा पुणे येथे बुधवारी (दि. 25)  सकाळी नऊ वाजता दुचाकीवरून प्रवास करत असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. २५) सकाळी कात्रज जवळील नवले ब्रिजवर घडली.

खेडेकर याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. गडहिंग्लज येथे बुधवारी (दि. २५) रात्री उशिरा अंत्यसंस्कार झाले. खेडेकर याचे बीई पर्यंत शिक्षण झाले असून पुणे येथे एका कंपनीत नोकरी करत होता. सकाळी घरातून कामावर जात असताना हा अपघात घडला. करंबळी (ता. गडहिंग्लज) विद्यामंदिरच्या निवृत्त सहाय्यक शिक्षिका कुसुम रेडेकर व निलजी (ता. गडहिंग्लज) येथील मराठी विद्या मंदिरचे निवृत्त मुख्याध्यापक आनंदा खेडेकर यांचा तो सुपुत्र होय.

SCROLL FOR NEXT