पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली येथे चार वाहनांचा अपघात झाला. Pudhari News Network
कोल्हापूर

kolhapur Accident: पुलाची शिरोली येथे ४ वाहने एकमेकांवर आदळली

पुढारी वृत्तसेवा

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा: पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे चार वाहनांचा एकेरी मार्गावर झालेल्या अपघातात वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने किरकोळ जखमी वगळता जीवित हानी झाली नाही. हा अपघात आज (दि. २६) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.

डंपर चालकाने अचानक ब्रेक लावल्याने अपघात

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याकडून कोल्हापूरच्या दिशेने फॉर्च्यूनर व इंडिका कार जात होती. त्यांच्या पाठोपाठ डंपर जात होता. दरम्यान महामार्गाचे काम सुरू असल्याने डंपर चालकाने अचानक ब्रेक लावला. तसेच फॉर्च्युनर व इंडिका कार चालकानेही सावधानता बाळगत ब्रेक लावला. पण पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने या दोन्ही गाड्यांना जोराची धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही कार पुढे अचानक थांबलेल्या डंपरवर जाऊन आदळल्या.

इंडिका, फॉर्च्युनर कारचे मोठे नुकसान

या अपघातात मोठ्या प्रमाणात इंडिका कारचे नुकसान झाले. तर फॉर्च्युनर कारचे ही नुकसान झाले. या अपघातात सुदैवाने किरकोळ जखमी वगळता कोणतीही जीवित हानी झाली नाही. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक एक तासापेक्षा अधिक वेळ ठप्प झाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT