Rankala Traffic Update | रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर प्रवेश बंद; एकेरी वाहतूक सुरू 
कोल्हापूर

Rankala Traffic Update | रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर प्रवेश बंद; एकेरी वाहतूक सुरू

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकेरी मार्गाचे नियोजन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता रंकाळा टॉवर चौकात 5 मार्च ते 20 मार्च 2026 या कालावधीत 15 दिवस प्रायोगिक तत्त्वावर नवीन वाहतूक नियोजन लागू करण्यात आले आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या सूचनेनुसार काही मार्ग एकेरी करण्यात आले असून काही ठिकाणी ‘नो पार्किंग झोन’ जाहीर करण्यात आले आहेेत.

फुलेवाडी नाका-रंकाळा टॉवर, खराडे महाविद्यालय-जॉकी बिल्डिंग आणि कृष्णा मेडिकल-रंकाळा टॉवर या मार्गावर अनियमित पार्किंगमुळे वारंवार कोंडी होत होती. यावर उपाय म्हणून रंकाळा टॉवर ते रंकाळा स्टँड हा मार्ग सर्व वाहनांसाठी एकेरी करण्यात आला आहे. रंकाळा स्टँडकडून थेट रंकाळा टॉवरकडे येण्यास बंदी घालण्यात आली असून वाहनचालकांना साकोली कॉर्नर-तटाकडील तालीम चौकमार्गे वळसा घ्यावा लागणार आहे.

जॉकी बिल्डिंगकडून तालीम चौकाकडे जाण्यास तसेच रंकाळा टॉवर ते जॉकी बिल्डिंगकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. तटाकडील तालीम चौकाच्या चारही बाजूंना 50 मीटरपर्यंत तसेच जॉकी बिल्डिंग परिसरातील तिन्ही मार्गांवर 50 मीटरपर्यंत ‘नो पार्किंग झोन’ लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी या नियोजनास सहकार्य करावे तसेच सूचना व हरकती 15 दिवसांच्या आत शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे सादर कराव्यात, असे आवाहन पोलिस निरीक्षकांनी केले आहे.

एकेरी मार्ग

रंकाळा टॉवर ते रंकाळा स्टँड मार्ग सर्व वाहनांसाठी एकेरी.

रंकाळा स्टँडकडून थेट रंकाळा टॉवरकडे येण्यास सर्व वाहनांना प्रवेशबंदी.

रंकाळा स्टँडकडून साकोली कॉर्नर-तटाकडील तालीम चौक मार्गे रंकाळा टॉवरकडे एकेरी मार्ग.

जॉकी बिल्डिंगकडून साकोली कॉर्नर-तालीम चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद.

रंकाळा टॉवर ते जॉकी बिल्डिंगकडे जाण्यास बंदी; वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.

जाऊळाचा गणपतीकडून रंकाळा टॉवर चौकात येणारी वाहतूक बंद.

जॉकी बिल्डिंगकडून रंकाळा टॉवरकडे जाण्यास एकेरी मार्ग लागू.

नो पार्किंग झोन

तटाकडील तालीम चौकाच्या चारही बाजूंना 50 मीटरपर्यंत नो पार्किंग झोन

जॉकी बिल्डिंग परिसरातील तिन्ही मार्गांवर 50 मीटरपर्यंत नो पार्किंग झोन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT