Abhay App | डिजिटल अरेस्‍टला रोखणार ‘अभय’ ॲप 
कोल्हापूर

Abhay App | डिजिटल अरेस्‍टला रोखणार ‘अभय’ ॲप

सीबीआयचे एआय तंत्रज्ञानावर आधारित ॲप्लिकेशन : ‘अरेस्‍ट नोटीस’ची होणार तत्काळ पडताळणी

पुढारी वृत्तसेवा

आशिष आडिवरेकर

कोल्‍हापूर : डिजिटल अरेस्‍टचा बनाव वेळीच ओळखण्‍यासाठी आणि नागरिकांची फसवणूक थांबविण्‍यासाठी सीबीआयने (सेंट्रल ब्‍युरो ऑफ इंडिया) नवीन अभय ॲप विकसित केले आहे. या माध्‍यमातून डिजिटल अरेस्‍टच्‍या नोटीसची तत्‍काळ सत्‍यता पडताळणी होऊन, फसवणुकीच्‍या घटनांना आळा बसणार आहे.

संपूर्ण देशामध्‍ये डिजिटल अरेस्‍टच्‍या नावाने फसवणुकीच्‍या घटनांमध्‍ये सध्‍या वाढ झाली आहे. हजारो कोटींची फसवणूक होत आहे. अशा घटनांना पायबंद घालण्‍यासाठी सीबाआयने ‘अभय’ ॲप विकसित केले आहे. यामध्‍ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्‍यात आला आहे. सायबर गुन्हेगार सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून व्हॉटस्ॲ‌प किंवा ई-मेलवर बनावट समन्स पाठवतात. हे ॲप तुम्हाला ती नोटीस खरी आहे की बनावट, हे एका क्लिकमध्ये ओळखण्यास मदत करते.

वापरण्‍याची पद्धत

सीबीआयच्या (cbi.gov.in) या अधिकृत वेबसाईटवर जाऊन, अभय लोगोवर क्लिक करून मोबाईलवर आलेला ओटीपी व्‍हेरीफाय करा. ठगसेनाकडून आलेली नोटीस स्कॅन करून अपलोड करा. काही सेकंदातच नोटीस खरी आहे की खोटी याची पडताळणी होऊन तत्‍काळ माहिती मिळते.

डिजिटल अरेस्‍ट असा कोणताही प्रकार नाही. यामुळे नागरिकांनी असा कॉल आल्‍यास घाबरू नये. सत्‍यता पडताळण्‍यासाठी सायबर पोलिस, अभय ॲपचा वापर करावा. फसवणूक झाल्‍यास गोल्‍डन अवरमध्‍ये तक्रार केल्‍यास फसवणुकीची रक्‍कम परत मिळण्‍यास मदत होते.
संजय हारुगडे, पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT