कोल्हापूर

कोल्हापूर : रस्त्याच्या बाजूचे गॅल्वनाइज क्रश बॅरीअर चोरताना चोरटा जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

गारगोटी : पाल नजीक रस्त्याच्या कडेला संरक्षणासाठी लावलेले गॅल्वनाइजचे क्रश बॅरीअर चोरतांना भुदरगड पोलीसांनी एकास रंगेहात पकडले असुन एक जण फरारी झाला आहे. २ लाख ५० हजारांचे गॅल्वनाइजचे क्रश बॅरीअर व गाडी असा सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल झाला असून दिलीप भरत झुवे (वय-३२, रा. महागाव, ता. गडहिंग्लज. सद्या रा. निपाणी) यास अटक केली आहे. तर एकाने पलायन केले आहे.

फराकटे कन्स्ट्रक्शन ग्रुपचे गारगोटी ते मांगनूर रस्त्याचे काम गेली दोन वर्षे सुरू आहे. या कामासाठी आणलेल्या साहित्याची सातत्याने चोरी होत होती. यासाठी कंपनीने वॉचमन ठेवून पाळत ठेवली होती. बुधवारी (दि.३१) रात्रीच्या सुमारास पाल गावानजीक गारगोटी-पिंपळगाव रस्त्याच्या बाजूला लावलेले गॅल्वनाइजचे क्रश बॅरीअर चोरून गाडीमध्ये भरत असल्याचे फराकटे कन्स्ट्रक्शन ग्रुपच्या मॅनेजर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ही माहिती शाखा अभियंता अक्षय गडदे यांना दिली. गडदे यांनी पोलिसांना तातडीने माहिती दिली असता रात्र गस्तीस असलेले पोलीस युवराज पाटील, विनायक पाटील यांनी चोरट्यास रंगेहात पकडले. २ लाख ५० हजार रूपयांचे गॅल्वनाइजचे बॅरीअर व टेंम्पो असा सुमारे ७ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील, उपनिरीक्षक योगेश गोरे करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT