गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापूरच्या रस्त्यांवर अवतरणार स्त्रीशक्ती 
कोल्हापूर

गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापूरच्या रस्त्यांवर अवतरणार स्त्रीशक्ती

दैनिक ‘पुढारी’ व कस्तुरी क्लबतर्फे 15 मार्चला कोल्हापुरात महिलांची भव्य बाईक रॅली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून महिलांचा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मानाचा गौरव करण्यासाठी दैनिक ‘पुढारी’ आणि पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने महिलांच्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक 15 मार्च 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता ऐतिहासिक दसरा चौक मैदान येथून या रॅलीचा शुभारंभ होणार आहे.

स्त्रीशक्तीचा हुंकार आणि परंपरेचा सन्मान करणारी ही रॅली कोल्हापूरच्या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे. यावर्षीच्या रॅलीचे मुख्य प्रायोजक अदानी समूह असून, आर्च आयुर्वेदातर्फे सहभागी होणार्‍या प्रत्येक महिलेला हमखास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे.

नोंदणी आणि नियम

ऑनलाईन नोंदणी अनिवार्य : लकी ड्रॉ आणि खात्रीशीर भेटवस्तूंसाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

प्रमाणपत्र : सहभागी होणार्‍या प्रत्येक महिलेला सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

कोल्हापूरच्या महिलांनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होऊन नववर्षाचे स्वागत उत्साहात करावे, असे आवाहन दैनिक ‘पुढारी’ आणि कस्तुरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क ः 9175613002, 9146488183.

असा असेल रॅलीचा मार्ग

दसरा चौक येथून सुरू होणारी ही रॅली खानविलकर पेट्रोल पंप, कलेक्टर ऑफिस, धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी चौक, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशन, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका, भाऊसिंगजी रोड आणि सीपीआर चौकमार्गे पुन्हा दसरा चौक येथे विसर्जित होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT