केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या भीषण आगीनंतर परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. Pudhari Photo
कोल्हापूर

केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात जमावबंदी आदेश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरामधील केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरूवारी (दि.८) रात्री ८.३० च्या सुमारास आग लागली. त्यामुळे या परिसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची आणि मानवी जीवितास, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील १०० मीटर अंतरावर कोणत्याही अशासकीय व्यक्तीस प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती जुना राजवाडा पोलिसांनी दिली आहे. (Keshavrao Bhosale Theatre)

Summary

  • केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरूवारी रात्री भीषण आग

  • कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता

  • १०० मीटर परिसरात अशासकीय व्यक्तीस प्रवेश करण्यास बंदी

उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी करवीर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये प्रदान असलेल्या अधिकारास अनुसरून दि. ९ ऑगस्ट ते दि. २४ ऑगस्टपर्यंत केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात अग्निशमन यंत्रणा, पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी व आपत्ती संदर्भातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना आपत्ती विषयक कामकाज करण्यास मुभा राहील. (Keshavrao Bhosale Theatre)

या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी करवीर यांनी लागू केले आहेत. (Keshavrao Bhosale Theatre)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT