777 online gaming | सावधान... 777 ऑनलाईन गेमिंगाच्या अमिषाने आर्थिक लूट? 
कोल्हापूर

777 online gaming | सावधान... 777 ऑनलाईन गेमिंगाच्या अमिषाने आर्थिक लूट?

झटपट श्रीमंतीच्या नादात सर्वसामान्यांची होतेय लूट

पुढारी वृत्तसेवा

सुनील कांबळे

नागाव : सध्या सोशल मीडिया आणि विविध प्लॅटफॉर्मवर 777, कलर प्रेडिक्शन आणि ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप्सच्या जाहिरातींचा सुळसुळाट झाला आहे. ‘घरी बसून लाखो कमवा‘ किंवा ‘फक्त 10 रुपये लावा आणि हजारो जिंका‘ अशा आकर्षक टॅगलाईन्समुळे तरुण पिढी या खेळांकडे मोठ्या प्रमाणावर ओढली जात आहे. मात्र, या चकाकी आणि झगमगाटामागील वास्तव अत्यंत भयावह आहे.

फायदे की केवळ भास?

सुरुवातीचा नफा : नवीन खेळाडूंना आकर्षित करण्यासाठी देतात छोटे विजय

वेळेचा सदुपयोग (दावा) : रिकाम्या वेळेत पैसे कमवण्याचे साधन म्हणून याची जाहिरात

कमी गुंतवणूक : अगदी कमी रकमेमुळे विद्यार्थी होतात आकर्षित

वस्तुस्थिती : यूजरला या खेळाचे जडते व्यसन

धोक्याची घंटा : तोटे आणि गंभीर परिणाम

या खेळांमध्ये सहभागी होण्याचे परिणाम आर्थिक नुकसानीपलीकडे :

आर्थिक दिवाळखोरी : एकदा सवय लागली की, हरलेले पैसे परत मिळवण्यासाठी यूजर अजून पैसे लावतो आणि कर्जाच्या खाईत लोटला जातो.

मानसिक ताण आणि नैराश्य : सततच्या हारण्यामुळे चिडचिड होणे, झोप न येणे आणि गंभीर नैराश्य येण्याचे प्रमाण वाढले आहे.

डेटा चोरीचा धोका : ही अ‍ॅप्स अनेकदा अनधिकृत असतात. डाऊनलोड करताना ती तुमच्या फोनमधील गॅलरी, कॉन्टॅक्टस् आणि बँक डिटेल्सचा अ‍ॅक्सेस घेतात, ज्यामुळे सायबर फसवणुकीचा धोका निर्माण होतो.

कायदेशीर कचाटा : भारतात अनेक राज्यांमध्ये ऑनलाईन सट्टा खेळणे बेकायदेशीर आहे. अशा अ‍ॅप्सवर कारवाई झाल्यास तुमचे गुंतवलेले पैसे कधीही परत मिळत नाहीत.

काय आहेत या खेळांचे स्वरूप?

या अ‍ॅप्समध्ये प्रामुख्याने रंगांचा अंदाज लावणे, कॅसिनो गेम्स किंवा छोट्या टास्कच्या नावाखाली पैसे गुंतवायला लावले जातात. सुरुवातीला यूजर्सना विश्वास बसवण्यासाठी काही प्रमाणात छोटे नफे दिले जातात, परंतु एकदा मोठी रक्कम गुंतवली की गणिते बदलतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT