कोल्हापूर : पाणी आणि कोळशापासून होणार्या वीजनिर्मितीच्या मर्यादा लक्षात घेऊन सरकारने गेल्या तीन दशकांपासून आरंपरिक ऊर्जा स्रोतावर भर देण्यास सुरुवात केली आहे. आता त्याला यश मिळू लागले असून सौरऊर्जेद्वारे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होत आहे. अगदी घराच्या छतापासून ते सौर कृषी पंपापर्यंत सौरऊर्जेचा वापर होत आहे.
केंद्र सरकारच्या अनुदानातून सौरछताद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील 3,151 घरगुती वीज ग्राहकांनी 11 हजार 300 किलोवॅट क्षमतेची सौरछत यंत्रणा बसविली आहे. या यंत्रणेतून दरमहा 23 लाख 10 हजार 200 युनिट सौरउर्जा निर्मिती होत आहे. एवढेच नाही तर 7,612 ग्राहकांच्या (8 हजार 95 किलोवँट) अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. रुप टॉप सोलर, सौर कृषी पंप आणि उच्चदाब अशी एकुण सुमारे 75 हजार किलोवॅट वीज निर्मिती सुरु आहे. केंद्र सरकारच्या योजनेतून घरगुती ग्राहकांना 1 ते 3 किलोवॅटपर्यंत सौर छत संचास 40 टक्के, 4 ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान आहे. सामुहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेत समूह गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळते.
सौरछत संच अनुदानासाठी प्रतीकिलोवॅटप्रमाणे संचाचे दर पुढीलप्रमाणे, 1 ते 3 किलोवॅटकरीता 41 हजार 400 रुपये, 3 ते 10 किलोवॅटसाठी 39 हजार 600 रुपये, 10 ते 100 किलोवॅटसाठी 37 हजार रुपये आणि 100 ते 500 किलोवॅटसाठी 35 हजार 886 रुपये दर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 3151 घरगुती वीज ग्राहकांनी 11 हजार 300 वीज निर्मिती सुरु केली आहे. तर 10 हाजार 843 ग्राहकांचे प्रस्ताव मंजूर आहेत. तर 7612 ग्राहकांचे प्रस्ताव कार्यान्वित होण्याच्या मार्गावर असून 80 ग्राहकांचे प्रस्ताव पाईपलाईनमध्ये आहेत. या सर्व ग्राहकांचे प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कोट्यवधी युनिट सौर उर्जा निर्मिती होण्यास मदत होणार आहे. विना अनुदानित सौरछत यंत्रणेव्दारे कोल्हापूर जिल्ह्यातील 2 हजार 704 ग्राहकांनी यंत्रणा बसविली आहे. त्याची आस्थापित क्षमता 50 हजार 825 किलोवॅट आहे. वीज ग्राहक दरमहा सौरद्वारे 1 कोटी युनिट प?क्षा अधिक वीज निर्मिती करीत आहेत. 1 किलोवँट सोलर रुफ टॉप यंत्रणेसाठी सावली पडणार नाही अशी 108 चौ. फू. जागा आवश्यक आहे.
जिल्ह्यात रूफ टॉप सोलर आणि सौर कृषी पंप, सौर उपकेंद्र अशा सौर ऊर्जा योजनांना ग्राहकांचा आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून हजारो ग्राहकांचे वीज बिल शून्य होत आहे; तर शेतकर्यांना दिवसा वीज मिळण्याची सोय झाली आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता जी. एम. लटपटे यांनी दिली.
जिल्ह्यातील 4 हजार 82 उच्चदाब ग्राहकांनी सौरयंत्रणेद्वारे 63.6 मेगावॅट वीजनिर्मिती केली आहे. सौर कृषी पंप आणि इतर ग्राहकांनी 61 मेगावॅट तर हरोली येथील सौर उपकेंद्राद्वारे 3 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे.
गडहिंग्लज 100 ग्राहक 30 मेगावॅट, इचलकरंजी 543 ग्राहक 2.05 मेगावॅट, जयसिंगपूर 502 ग्राहक 1.68 मेगावॅट, ग्रामीण एक : 284 ग्राहक 0.93 मेगावॅट, ग्रामीण दोन : 572 ग्राहक 1.96 मेगावॅट, कोल्हापूर अर्बन : 1160 ग्राहक 4.37 मेगावॅट तर एकूण 3161 ग्राहकांची 11.3 मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे.
1. एक किलोवॅट सोलर रूफ टॉपमधून दरमहा 120 युनिट वीज निर्मिती
2. एक किलोवॅट क्षमतेच्या सोलर रूफ टॉप यंत्रणेसाठी 50 ते 55 हजार दरम्यान खर्च
3. एक किलोवॅटसाठी 41 हजार 400 रुपये आधारभूत किमतीवर 40 टक्के अनुदान
4. वीज बिलातील बचतीमुळे 4 ते 5 वर्षांत गुंतवणुकीची रक्कम परतफेड