Kolhapur foundry industry crisis | कोल्हापूर जिल्ह्यातील 70 टक्के फाऊंड्री उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर 
कोल्हापूर

Kolhapur foundry industry crisis | कोल्हापूर जिल्ह्यातील 70 टक्के फाऊंड्री उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर

युद्धाची झळ; भाडे, गॅस टंचाईमुळे काम थांबवण्याची वेळ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मध्य पूर्वेत गेल्या 13 दिवसांपासून भडकलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट कोल्हापूरच्या उद्योगांवर उमटले आहेत. विशेषतः फाऊंड्री सेक्टरला या युद्धाचा मोठा तडाखा बसला असून, इंधनाचा तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या वाहतूक खर्चामुळे उद्योजक हवालदिल झाले आहेत. परिस्थिती अशीच राहिली तर कोल्हापूर जिल्ह्यातील 70 टक्के फाऊंड्री आठवडाभरात बंद पडतील अशी भीती उद्योजक व्यक्त करत आहेत.

फाऊंड्री उद्योगात गनमेटल, अ‍ॅल्युमिनियम आणि कास्टिंग कोअर तयार करण्यासाठी गॅसचा वापर इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर केला जातो. मात्र, सध्या बाजारात गॅसचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. ज्यांच्याकडे जुना स्टॉक आहे, ते कसेबसे काम रेटत आहेत. मात्र, बहुतांश उद्योजकांना ‘आजपासून गॅस मिळणार नाही’ असे सांगितले जात असल्याने उत्पादन थांबवण्याची वेळ आली आहे. सोबतच कच्च्या मालाच्या किमतीतही भरमसाट वाढ झाली आहे.

सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर असल्या तरी त्यावर परिणाम झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. फाऊंड्री व्यवसायातील वाढता उत्पादन खर्च आणि कोलमडलेली पुरवठा साखळी यामुळे कोल्हापूरचा हा महत्त्वाचा उद्योग सध्या ‘व्हेंटिलेटर’वर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT