कसबा बावडा : निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत डॉ. संजय डी. पाटील, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. श्रीलेखा साटम, डॉ. संतोष चेडे, डॉ.एल. व्ही. मालदे, प्रा. सुदर्शन सुतार, प्रा. मकरंद काईंगडे आदी. 
कोल्हापूर

kolhapur | डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड

प्लेसमेंटचा नवा विक्रम : ६.३ लाख रुपये सरासरी पॅकेज

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी संस्थेने २०२५-२६ मध्ये तब्बल ६३८ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. महाविद्यालयाकडून गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, सर्वांगीण विकासावर दिलेला भर व सक्षम प्लेसमेंट व्यवस्थेमुळे यावर्षीही विक्रमी संख्येने विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळवून दिल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील यांनी सांगितले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, अधिष्ठाता (सीडीसीआर) प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राचार्य उपस्थित होते. यावर्षीच्या प्लेसमेंटमध्ये सरासरी ६.३ लाख रुपये पॅकेज मिळाले असून २०० हून अधिक विद्यार्थ्यांना ६ लाखांपेक्षा अधिक वार्षिक पगाराच्या ऑफर्स आहेत.

ऋतुराज पाटील म्हणाले, नुकतेच महाविद्यालयाला वॉशिंग्टन अकॉर्डच्या निकषांनुसार एनबीए मानांकन व शिवाजी विद्यापीठाकडून अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्थेचा दर्जाही मिळाला आहे. यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकटी मिळाली आहे. पृथ्वीराज पाटील म्हणाले, प्लेसमेंटमधील हे यश विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम, प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि संस्थेच्या सक्षम शैक्षणिक व्यवस्थेचे प्रतीक आहे. कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता म्हणाले, उद्योग, महाविद्यालयाचे सहकार्य, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अत्याधुनिक प्रयोगशाळा, इनोव्हेशन आणि संशोधनाला दिले जाणारे प्रोत्साहन यामुळे या संधी उपलब्ध झाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT