सतीश सरीकर
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या नव्या सभागृहात तब्बल 59 फ्रेश म्हणजे नवे चेहरे नगरसेवक म्हणून आले आहेत. यात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज, माजी आमदार जयश्री जाधव यांचा मुलगा सत्यजित यांच्यासह माजी महापौर, माजी नगरसेविकेचे पतीसह इतरांचा समावेश आहे. तसेच, 59 पैकी तब्बल 47 जण कुटुंबात कोणीही नगरसेवक नसताना ते नगरसेवक झाले.
दरम्यान, महापालिका निवडणुकीत पुन्हा नशीब आजमावणार्या दोन माजी महापौरांसह 22 माजी नगरसेवकांना पुन्हा सभागृहात येण्याची संधी मिळाली आहे. तसेच, तब्बल 27 नगरसेवकांना पराभवाचा झटका देत जनतेने नाकारले. कोल्हापूर शहरात या माजी नगरसेवकांच्या जय-पराजयाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रमुख विजयी झालेल्यांत माजी महापौर स्वाती यवलुजे व माधवी गवंडी, माजी परिवहन समिती सभापती प्रतिज्ञा उत्तुरे, माजी उपमहापौर अर्जुन माने व संजय मोहिते, तर प्रमुख पराभूतात माजी उपमहापौर भूपाल शेटे, विलास वास्कर यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
विजयी माजी नगरेसवक असे...
2026 ते 2031 या पंचवार्षिक सभागृहासाठी कोल्हापूरच्या मतदारांनी सुभाष बुचडे, अर्चना पागर, राजेश लाटकर, स्वाती यवलुजे, अर्जुन माने, पल्लवी देसाई, माधवी गवंडी, प्रताप जाधव, अनुराधा खेडकर, इंद्रजित बोंद्रे, शारंगधर देशमुख, माधुरी नकाते, जयश्री चव्हाण, आदील फरास, नियाज खान, विनायक फाळके, संजय मोहिते, प्रतिज्ञा उत्तुरे, मुरलीधर जाधव, अर्चना कोराणे, प्रवीण केसरकर, विजयसिंह खाडे यांना विजयी करून नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.
पराभूत माजी नगरसेवक असे...
प्रकाश पाटील, स्मिता माने, संजय निकम, तेजस्विनी घोरपडे, नंदकुमार मोरे, उमा बनछोडे, विजय साळोखे, राहुल माने, दत्ता टिपुगडे, दिलीप पोवार, दीपा मगदूम, महेश सावंत, यशोदा मोहिते, शारदा देवणे, रमेश पुरेकर, संगीता पोवार, ईश्वर परमार, पद्मजा भुर्के, प्रकाश नाईकनवरे, अजित मोरे, विलास वास्कर, पद्मावती पाटील, शोभा कवाळे, रवींद्र मुतगी, रशीद बारगीर, भूपाल शेटे, मधुकर रामाणे, राजू दिंडोर्ले या माजी नगरसेवकांना जनतेने पराभूत करून नाकारले.
काहीजण दोन-तीनवेळा सभागृहात
माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह राजेश लाटकर, अर्जना पागर, स्वाती यवलुजे, अर्जुन माने, अर्चना कोराणे, प्रवीण केसरकर, प्रताप जाधव, माधवी गवंडी, इंद्रजित बोंद्रे, माधुरी नकाते, नियाज खान, विनायक फाळके, विजय खाडे आदी दुसर्यांदा महापालिका सभागृहात येत आहेत. सुभाष बुचडे, अनुराधा खेडकर, शारंगधर देशमुख, माधुरी नकाते, जयश्री चव्हाण, आदील फरास, संजय मोहिते, मुरलीधर जाधव तिसर्यांदा नगरसेवक झाले आहेत.
पहिल्यांदाच झालेले नगरसेवक...
माजी नगरसेविका कविता माने यांचे पती वैभव माने, माजी महापौर सुनील कदम यांचा मुलगा स्वरूप कदम, माजी नगरसेविका मंगल चव्हाण यांचा मुलगा विशाल चव्हाण, माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांच्या पत्नी दीपा ठाणेकर, माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे पती अश्किन आजरेकर, माजी महापौर जयश्री सोनवणे यांचा मुलगा प्रवीण सोनवणे, माजी उपमहापौर प्रार्थना समर्थ यांचा मुलगा अमर समर्थ, माजी महापौर कांचन कवाळे व माजी नगरसेवक शिवाजी कवाळे यांचा मुलगा रोहित कवाळे, माजी महापौर दीपक जाधव यांच्या स्नुषा सृष्टी जाधव, माजी नगरसेविका छाया पोवार यांचे पती उमेश पोवार, माजी नगरसेविका वृषाली कदम यांचे पती दुर्वास कदम, माजी नगरसेवक सतीश लोळगे यांची मुलगी मानसी लोळगे यांच्यासह इतर नवे चेहरे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून सभागृहात येतील.