kolhapur | 5.62 कोटींची फसवणूक : फरार संशयिताला अटक 
कोल्हापूर

kolhapur | 5.62 कोटींची फसवणूक : फरार संशयिताला अटक

जादा परताव्याच्या आमिषाने फसवणूक; डिसेंबर 2023 पासून होता फरार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गुंतवणुकीवर दरमहा साडेचार टक्के परतावा देण्याच्या आमिषाने 5 कोटी 62 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीच्या फरार संशयिताला आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी पाचगाव (ता. करवीर) येथून अटक केली. अतुल बळवंत वाघ (रा. कदमवाडी, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित डिसेंबर 2023 पासून फरार होता.

फसवणूकप्रकरणी यापूर्वी अटक झालेल्या इंद्रजित सुभाष कदम (वय 46, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) याने गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक गोळा केली होती. शेअर मार्केटमधून गुंतवणुकीवर दरमहा साडेचार ते पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑगस्ट 2022 ते डिसेंबर 2023 या काळात गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आले होते.

गुंतवणूकदारांना प्रत्यक्षात परतावा आणि मुद्दल न मिळाल्याने गुंतवणूकदार विजया कांबळे (वय 46, रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गुन्हे शाखेमार्फत गुन्ह्याचा तपास सुरू आहे. एकूण 9 पैकी 8 आरोपींना अटक झाली असून, संशयित अतुल वाघ फरारी झाला होता. सोमवारी त्याला पाचगाव (करवीर) येथून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यास दि. 20 फेब—ुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT