बर्ड्स ऑफ कोल्हापूर आणि निसर्गप्रेमी मित्र संस्थेच्यावतीने महालक्ष्मी तलावावर पक्षीगणना करण्यात आली. Pudhari Photo
कोल्हापूर

पेठवडगाव येथील महालक्ष्मी तलावावर ८४ प्रजातीच्या ५५७ पक्ष्यांची नोंद

बर्ड्स ऑफ कोल्हापूर, निसर्गप्रेमी मित्र संस्थेच्यावतीने पक्षीगणना

पुढारी वृत्तसेवा

पेठवडगाव : पेठवडगावच्या ऐतिहासिक महालक्ष्मी तलाव परिसरात ८४ प्रजातीच्या एकूण ५५७ पक्ष्यांची 'ई बर्ड' वर नोंद करण्यात आली. बर्ड्स ऑफ कोल्हापूर आणि निसर्गप्रेमी मित्र संस्थेच्यावतीने ही पक्षीगणना करण्यात आली.

वडगाव येथील कोल्हापूर रोडलागत शाहूकालीन तलाव आहे. या विस्तीर्ण तलावाच्या आजूबाजूलाही वृक्षसंपदा आहे. दरवर्षी या ठिकाणी दूरदेशातून विविध पक्षांचे आगमन होते. या ठिकाणी पक्षीनिरीक्षणसाठी दरवर्षी पक्षीप्रेमींची गर्दी होते. या वर्षी बर्ड्स ऑफ कोल्हापूर आणि निसर्गप्रेमी मित्र संस्थेच्यावतीने पक्षिगणना करण्यात आली. परिसरात ८४ प्रजातीच्या एकूण ५५७ पक्ष्यांची ' ई बर्ड ' वर नोंद करण्यात आली. यामध्ये २० स्थलांतरित पक्ष्यांची यात चक्रांग बदक, थापट्या बदक, चक्रवाक, सामान्य हिरवा टिलवा, हिरवी तुतारी, ठीपकेवाली तुतारी, सामान्य टिलवा, टेमिंकचा टिलवा, लाल कंठाचा माशीमार, तपकिरी माशीमार, ब्लिथ चा बोरू वटवट्या, साइक्स चा वटवट्या, पायमोज वटवट्या, हिरवट पर्णी वटवट्या, चिपचीप , शंकर, हिवाळी गप्पिदास, वृक्ष तिरचिमणी , पिवळा धोबी, पांढरा धोबी या विविध पक्षांचा समावेश आहे.

विशेष बाब म्हणजे IUCN च्या रेड लिस्ट मधील नदीसुरय आणि पांढऱ्या मानेचा करकोचा या पक्ष्यांचीही यावेळी नोंद करण्यात आली आहे. या उपक्रमात बर्डस ऑफ कोल्हापूरचे प्रणव देसाई, सुधीर भाटवडेकर, मंदार रुकडीकर आणि ऋतुजा पाटील, निसर्गप्रेमी मित्र चे पक्षी अभ्यासक डॉ अमोल पाटील, संदीप पाटील, प्रकाश जगदाळे, निलेश घारसे, डॉ राजन अत्तिग्रे, डॉ विशाल पाटील,योगेश यादव, सूरज निगवे, बिपिन माळी, नितीन गुरव, बाजीराव माळी, जैद मोमीन यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT