Gadhinglaj fraud case | गडहिंग्लजमध्ये फायनान्स कंपनीची 49 लाखांची फसवणूक pudhari photo
कोल्हापूर

Gadhinglaj fraud case | गडहिंग्लजमध्ये फायनान्स कंपनीची 49 लाखांची फसवणूक

6 जणांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

गडहिंग्लज : बँकेचे कर्ज आणि तारण असल्याचे सत्य लपवून तसेच मिळकत निर्वेध असल्याची खोटी कागदपत्रे तयार करून फायनान्स कंपनीकडून सुमारे 49 लाख 27 हजार 699 रुपयांचे कर्ज उचलून फसवणूक केल्याचा प्रकार गडहिंग्लज येथे उघडकीस आला आहे.

या प्रकरणी रोहित विष्णू मंगुटकर, बायाक्का विष्णू मंगुटकर (दोघे रा. मेन रोड, तावरेवाडी, ता. गडहिंग्लज), मारुती अनिल केसरकर (गडहिंग्लज), शिवानंद ढुंडाप्पा लाटकर (रा. दुंडगे), राजश्री सागर पताडे, सागर सदाशिव पताडे (दोघे रा. भडगाव) या सहा जणांवर गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ऋषिकेश देशमुख (रा. कात्रज, पुणे, टायगर कॅपिटल प्रा. लि. शाखा पुणे) यांनी फिर्याद दिली. संशयितांनी मालमत्तांवर बँकेचे कर्ज असल्याचे लपवून खोट्या कागदपत्रांच्या आधारे कर्ज मंजूर करून घेतले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश मोरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT