₹48 Lakh Job Scam | नोकरीचे आमिष दाखवून ४८ लाखांची फसवणूक 
कोल्हापूर

₹48 Lakh Job Scam | नोकरीचे आमिष दाखवून ४८ लाखांची फसवणूक

तिघांवर गुन्हा दाखल; दोघांना अटक

पुढारी वृत्तसेवा

कळे : रेल्वे व आरोग्य खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून वारनुळ (ता. पन्हाळा) येथील तरुणांची ४८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर कळे पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

बबन बाबुराव कुंभार (रा. वारनुळ, ता. पन्हाळा) यांच्या फिर्यादीनुसार अमृत किसनराव काळोखे (रा. राजापूर, ता. खटाव, जि. सातारा), सुरेश शामराव देसाई (रा. करजवडे, ता. वाळवा, जि. सांगली), शिवाजी भाऊसाहेब मोहिते (रा. थेरगाव, पुणे) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी देसाई व मोहिते यांना अटक केली आहे.

संशयितांनी रेल्वेमध्ये टीसी पदासाठी २० लाख रुपये, सातारा आरोग्यसेवक पदासाठी १५ लाख रुपये याप्रमाणे ३५ लाख रुपयांची मागणी केली होती. यानुसार फिर्यादींनी वेगवेगळ्या बँक खात्यांवर त्यांना रक्कम पाठवली व नऊ लाख रुपये रोख असे एकूण ४८ लाख २५ हजार रुपये दिले. यानंतर संशयितांनी रेल्वे आणि आरोग्य खात्याचे बनावट शिक्के व बोगस कागदपत्रे वापरूनन नोकरीचे बनावट शासकीय नियुक्ती आदेश तयार केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT