कोल्हापूर : करवीर तालुक्यासह जिल्ह्यातील 41 हातभट्ट्या जेसीबीद्वारे उद्ध्वस्त करून 38 जणांना बेड्या ठोकल्या.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

kolhapur | कोल्हापूर जिल्ह्यात 41 गावठी दारू हातभट्ट्या जेसीबीद्वारे उद्ध्वस्त; 38 जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुण्यातील विषारी दारू दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिस दल आणि उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी कणेरीवाडी, मोरेवाडी, सरनोबतवाडीसह जिल्ह्यात गावठी दारूनिर्मितीच्या 41 हातभट्ट्या जेसीबीने उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत 38 जणांना अटक करण्यात आली असून, 12 लाख 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

स्थानिक गुन्हे अन्वेषण, राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने कणेरीवाडी, कंजारभाट वसाहत येथील हातभट्ट्यांवर कारवाई करून 1,200 लिटर कच्चे रसायन, 200 लिटर पक्के रसायन, 60 लिटर दारूसह 78 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. राजारामपुरी, हातकणंगले, गोकुळ शिरगाव, जयसिंगपूर, दानोळी येथील 21 हातभट्ट्यांवर छापे टाकून ही कारवाई केली.

चंदगड, दानोळी, निगवे, पोहाळेसह 20 ठिकाणी छापे

राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोरेवाडी, सरनोबतवाडी, कणेरीवाडी, माणगाव (ता. हातकणंगले), चंदगड, दानोळी (ता. शिरोळ), निगवे, पोहाळेसह 20 ठिकाणी छापे टाकून 32 जणांना अटक करून 40 गुन्हे दाखल केले.

काजल रोहित घारुंगे, प्रियंका संदीप घारुंगे, प्रकाश जॅक्सन बागडे, रोहित प्रकाश माटुंगे, प्रमोद सुनील बागडे, चरण वीरसिंग बागडे, सूरज सुरेश घारुंगे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गावठी दारू हातभट्टीविरुद्ध कारवाईची मोहीम अधिक तीव— करण्यात येणार असल्याचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT