सीपीआर  Pudhari File Photo
कोल्हापूर

‘सीपीआर’मधील 400 परिचारिका आजपासून संपावर

महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनच्या आंदोलनाला पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर ः महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनने प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारपासून ( दि. 20 ) राज्यव्यापी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील (सीपीआर) परिचारिकांनी पाठिंबा दिला असून 400 परिचारिका यामध्ये सहभागी होणार आहेत. गुरुवारी सकाळी साडेसात ते शुक्रवारी सकाळी साडेसात असे एकूण 24 तास काम बंद ठेवणार आहेत.

पाठ्यनिर्देशिका, प्राचार्य, उपप्राचार्य, विभागीय परिसेविका, परिसेविका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, सहायक अधिसेविका, अधिसेविका, लेक्चरर, प्रोफेसर पदोन्नती, परिचारिकांना मिळणारे भत्ते, नर्सिंग अलाऊंस, एम. जे. पी. जे भत्ता, नाईट सुपर भत्ता तसेच बक्षी खंड 2 मधील अन्याय दूर करा आदी मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी अनेकवेळा आंदोलने करूनदेखील शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे पुन्हा महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस फेडरेशनने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT