Hasan Mushrif | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या ३९ जागा मंजूर : मुश्रीफ 
कोल्हापूर

Hasan Mushrif | शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या ३९ जागा मंजूर : मुश्रीफ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : ​राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने ६ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या तुलनेत २०२६-२७ मध्ये पदव्युत्तरच्या १६.३ टक्के जागांची वाढ झाली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सीपीआर), कोल्हापूर येथे ३९ नवीन जागा मंजूर झाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

यामध्ये भूलशास्त्र (१०), जनरल सर्जरी (५), पीएसएम (४), त्वचा व गुप्तरोग (४), शरीरक्रियाशास्त्र (४), रेडिओलॉजी (४), मनोविकारशास्त्र (३), प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र (३), छाती व क्षयरोग (१) आणि नेत्ररोगशास्त्र (१) या विभागांचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे म्हणाले, ​ या वाढीव जागांमुळे भूलशास्त्र, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, रेडिओलॉजी यांसारख्या शाखांतून तज्ज्ञ डॉक्टर घडतील. सीपीआरची उपचार क्षमता वाढून सर्वसामान्यांना दर्जेदार सेवा मिळण्यास मोठी मदत होईल.

पदव्युत्तरच्या जागा मंजुरीसाठी अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने, उपअधीक्षक डॉ. गिरीष कांबळे, भूल शास्त्र विभाग प्रमुख डॉ. उल्हास मिसाळ, डॉ. बी. वाय. माळी, डॉ. वसंत देशमुख, डॉ. सुदेश गंधम, डॉ. अनिता सैबन्नावर, डॉ. भास्कर मूर्ती, डॉ. पवन खोत, डॉ. आशा खाडे आणि डॉ. अभिजित ढवळे यांनी विशेष योगदान दिले.

कोल्हापूरसाठी अभिमानास्पद बाब

कोल्हापूरसाठी ही अभिमानास्पद बाब असून, नियोजित पायाभूत सुविधा आणि विभागाच्या पाठपुराव्यामुळे ही वाढ शक्य झाली. यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनासह व्यापक रुग्णसेवेची संधी मिळेल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT