Kolhapur Loan Waiver | दुसर्‍या यादीत ३,८३३ शेतकर्‍यांना कर्जमाफी 
कोल्हापूर

Kolhapur Loan Waiver | दुसर्‍या यादीत ३,८३३ शेतकर्‍यांना कर्जमाफी

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर कर्जमुक्‍ती योजनेच्‍या दुसर्‍या यादीत जिल्‍ह्यातील ३,८३३ शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली. यामध्‍ये कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेच्‍या २,१६० तर राष्‍ट्रीयीकृत बँकांचे १,६७३ शेतकरी आहेत. एकूण ३०,८३० शेतकर्‍यांना योजनेचा लाभ मिळाला आहे. यादीत समावेश असलेल्‍या शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्‍टॅक नोंदणी केली नसल्‍यास ती तत्‍काळ करावी, असे आवाहन जिल्‍हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी केले आहे.

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर कर्जमुक्‍ती योजनेची दुसरी यादी शुक्रवारी प्रसिद्ध झाली. शासनाच्‍या पोर्टलवर जिल्‍ह्यातील ४१,५५२ बँक खात्‍यांची माहिती अपलोड केली होती. यापैकी २५ जुलैला योजनेची पहिली यादी प्रसिद्ध झाली. या यादीत २६,९९७ शेतकर्‍यांचा समावेश होता. दुसर्‍या यादीत ३,८३३ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. यापैकी जिल्‍हा बँकेच्‍या २,१६० शेतकर्‍यांना सुमारे १४.६२ कोटी रुपये कर्जमाफी मिळाली आहे.

शेतकरी कर्जमाफीचा थोडक्‍यात आढावा

पोर्टलवर अपलोड केलेली संख्‍या : ४१,५५२

पहिल्‍या यादीतील शेतकरी संख्‍या : २६,९९७

आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले शेतकरी : २१,३८८

आधार प्रमाणीकरण न केलेले शेतकरी : ५,६०९

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT