Kolhapur Drought Relief | जिल्ह्यातील ७४ हजारांवर शेतकऱ्यांना ३७ कोटी ४५ लाखांची मदत  pudhari photo
कोल्हापूर

Kolhapur Drought Relief | जिल्ह्यातील ७४ हजारांवर शेतकऱ्यांना ३७ कोटी ४५ लाखांची मदत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम मदत देण्याची घोषणा केली. यानुसार ५ नोव्हेंबरअखेर कोल्हापूर जिल्ह्यातील ७४ हजार ८९३ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर एकूण ३७ कोटी ४५ लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीचे नुकसान, उत्पादनातील घट आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, हा या मागील उद्देश आहे. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात येत आहेत. काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांवर अद्याप मदतीची रक्कम जमा झालेली नाही. बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी, खाते क्रमांक किंवा इतर तपशिलांमधील त्रुटी व अन्य कारणांमुळे काही अनुदान रखडले आहे. त्यामुळे मदतीसाठी पात्र असूनही काही शेतकऱ्यांना रकमेची प्रतीक्षा करावी लागत आहे. अशा शेतकऱ्यांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून कार्यवाही सुरू आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT