कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठासमोरील राजाराम तलाव परिसरात दोघांना अटक करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तब्बल 28 किलो गांजा जप्त केला. 5 लाख 60 हजार रुपये त्याची किंमत आहे. याप्रकरणी निहाल इकबाल शेख (वय 27, रा. शिरपूर, जि. धुळे) व चरण लालासो शिंदे (32, रा. माण, जि. सातारा) यांना अटक केली. ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने गुरुवारी ही धडक कारवाई केली.
खबर्याकडून राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजाराम तलाव परिसरात काहीजण गांजा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे, प्रवीण पाटील, वैभव पाटील, प्रदीप पाटील, गजानन गुरव आदींनी छापा टाकला. संशयास्पद दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तीन बॅगांमध्ये गांजा आढळला.