तडीपार Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur | कोल्हापुरातून २७५ जण होणार हद्दपार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्‍या पार्श्वभूमीवर पोलिस ॲक्शन मोडवर आले असून जिल्ह्यातील २७५ जणांवर हद्दपारीची तर ८ हजार ६९४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुंडांची कुंडली तयार केली असून लवकरच त्‍यांच्‍यावर कारवाई करण्यात येणार आहे.

यंदाचा गणेशोत्सवात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी दोन महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक घेऊन नियम, अटी व शर्तीची माहिती देण्यापासून सराईत गुन्हेगारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी क्राईम आढावा बैठकीत सराईत गुन्हेगारांसह त्यांच्या पंटरवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. यानुसार सर्वच पोलिस ठाण्यांनी हद्दीमधील गुंडांच्या हद्दपार, तडीपारीचे प्रस्ताव तयार करून ते प्रांताधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले होते. याला लवकरच मंजुरी मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT