Transfers of police officers | जिल्ह्यांतर्गत 27 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या File Photo
कोल्हापूर

kolhapur | जिल्ह्यांतर्गत 27 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

सचिन सूर्यवंशी राधानगरी, हाके हुपरी, कोडग इस्पुर्ली, क्रांती पाटील मुरगूडला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर पोलिस दलातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या 12, सहायक निरीक्षक 14 तर एक उपनिरीक्षक अशा 27 पोलिस अधिकार्‍यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी आदेश जारी केले. त्यात शहापूर, राधानगरी, चंदगड, हुपरी, इस्पुर्ली, जयसिंगपूर येथील अधिकार्‍यांचा समावेश आहे.

बदल्या झालेल्या अधिकार्‍यांची नावे आणि कंसात बदल्यांचे ठिकाण; पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे- नियंत्रण कक्ष (शाहूवाडी), अजित सिद - नियंत्रण कक्ष (पोलिस कल्याण उपक्रम), संजय हारूगडे - नियंत्रण कक्ष (सायबर पोलिस ठाणे), नामदेव शिंदे - नियंत्रण कक्ष (विमानतळ सुरक्षा), सतीश होडगर - सायबर (राजारामपुरी), रवींद्र कळमकर- राजारामपुरी (नियंत्रण कक्ष), सत्यवान हाके - जयसिंगपूर (हुपरी), सचिन सूर्यवंशी - शहापूर (राधानगरी), गजेंद्र लोहार - जिल्हा विशेष शाखा (शहापूर), निंगाप्पा चौखंडे- हुपरी (चंदगड), संतोष गोरे -राधानगरी (जयसिंगपूर), विश्वास पाटील - चंदगड (जिल्हा विशेष शाखा). सहायक निरीक्षक नागेश यमगर - आजरा (शिवाजीनगर), शितलकुमार कोल्हाळ - अ.मा.व्या.प्र. कक्ष (शिवाजीनगर), कैलास कोडग - कोडोली (इस्पुर्ली), क्रांती पाटील - इस्पुर्ली (मुरगूड), शिवाजी करे - मुरगूड (करवीर), रविराज फडणीस - पोलिस अधीक्षक वाचक (कोडोली), तबस्सूम मगदूम - गोकुळ शिरगाव (शाहूपुरी), अतुल कदम - नियंत्रण कक्ष (नेसरी), बाबासाहेब - करवीर (आजरा), भारत साळुंखे - राजारामपुरी (गगनबावडा), चेतन मसुटगे - नेसरी (गोकुळ शिरगाव), धोंडिराम वाळवेकर - नियंत्रण कक्ष (पोलिस अधीक्षक वाचक), रितल परुळे-शिवाजीनगर (अ.मा.व्या.प्र. कक्ष), मुदस्सर शेख - शाहूपुरी (नियंत्रण कक्ष), उपनिरीक्षक मृणालिनी कलगोंडा पाटील - नियंत्रण कक्ष (इचलकरंजी).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT