कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्यासह कोल्हापूर पोलिस दलातील २६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले. कोल्हापूर परिक्षेत्रातील ११८ अधिकाऱ्यांना सेवापदक घोषित झाले आहे. त्यात पोलिस उपअधीक्षक (१), पोलिस निरीक्षक (११), सहायक निरीक्षक (७), उपनिरीक्षक (७), सहायक उपनिरीक्षक (३७), हवालदार (५१) यांचा समावेश आहे.
सेवा पदक जाहीर झालेल्या अधिकाऱ्यांची नावे : पोलिस निरीक्षक सतीश शिंदे (पोलिस महानिरीक्षक वाचक, कोल्हापूर), शरद मेमाणे (शिवाजीनगर), किरण लोंढे ( जुना राजवाडा), सुशांत चव्हाण ( स्थानिक गुन्हे अन्वेषण), पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव (स्थानिक गुन्हे अन्वेषण), राकेश माने (ए.एच.टी.यू), महादेव गुरव ( गोकुळ शिरगाव), संदीप पावलेकर (एस.आय.टी), भीमगोंडा पाटील (कागल), सचिन खंडागळे (स्थानिक गुन्हे अन्वेषण).
अतिउत्कृष्ट सेवा पदक : पोलिस उपनिरीक्षक किरण कागलकर (जिविशा), राजेंद्र सोनसूरकर (पासपोर्ट शाखा), राजेंद्र घारगे (शहर वाहतूक शाखा), विठ्ठल जरग, शामसुंदर बुचडे ( के.आर.ओ.), गजानन सिद (कोडोली), दिवाकर होवाळे (शहर वाहतूक शाखा), अशोक कदम (वाहतूक शाखा), हेमलता पाटील (के.आर.ओ.), राजेश गायकवाड (डी.एस.बी.), सीताराम डामसे, शरद पोरे, भरत कांबळे (मुख्यालय), सचिन लोहार (अपर पोलिस अधीक्षक कार्यालय), एकनाथ गणपत चौगुले, वैशाली पुरुषोत्तम पिसे (ना.ह.सं.पथक) यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
कोल्हापूर परिक्षेत्रातील ११८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना सेवा पदक जाहीर झाले आहे. त्यात कोल्हापूर (२४), सांगली (३९), सातारा (२६), सोलापूर ग्रामीण (६), पुणे ग्रामीण (२३) यांचा समावेश आहे. परिक्षेत्रांतर्गत पोलिस उपअधीक्षक (१), पोलिस निरीक्षक (११), सहायक पोलिस निरीक्षक (७), उपनिरीक्षक (३७), हवालदार (५१), पोलिस नाईक (३), कॉन्स्टेबल (१) यांचा पदकप्राप्त यादीत समावेश आहे.