कोल्हापूर : अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांच्या २०२६च्या यादीत शिवाजी विद्यापीठातील २३ संशोधक व प्राध्यापकांनी स्थान मिळविले आहे. यात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव व माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह माजी विद्यार्थी व शिक्षकांचा समावेश आहे.
यादीमध्ये प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव (जैवरसायनशास्त्र), माजी प्र-कुलगुरू प्रा. प्रमोद पाटील (पदार्थविज्ञान), प्रा. केशव राजपुरे (पदार्थविज्ञान), डॉ. सागर डेळेकर (रसायनशास्त्र), प्रा. ए. व्ही. राव (पदार्थविज्ञान), प्रा. संजय गोविंदवार (पदार्थविज्ञान), प्रा. चंद्रकांत भोसले (पदार्थविज्ञान), डॉ. आण्णासाहेब मोहोळकर (पदार्थविज्ञान), प्रा. हेमराज यादव (रसायनशास्त्र), डॉ. सचिन ओतारी (नॅनोतंत्रज्ञान), प्रा. कल्याणराव गरडकर (रसायनशास्त्र), प्रा. तुकाराम डोंगळे (इलेक्ट्रॉनिक मटेरियल्स), डॉ. सुशीलकुमार जाधव (पदार्थविज्ञान), प्रा. विश्वास बापट (जैवतंत्रज्ञान), डॉ. नीलेश तरवाळ (पदार्थविज्ञान), प्रा. अनिल घुले (रसायनशास्त्र), डॉ. कृष्णा पवार (पदार्थविज्ञान), डॉ. तेजस्विनी भट (पदार्थविज्ञान) आणि डॉ. मानसिंग टाकळे (पदार्थविज्ञान) यांचा समावेश आहे. याशिवाय, या यादीत डॉ. सचिन भालेकर (गणित), डॉ. संजय लठ्ठे (पदार्थविज्ञान), डॉ. विठोबा पाटील (पदार्थविज्ञान) व डॉ. शरदराव व्हनाळकर (पदार्थविज्ञान) यांचा समावेश आहे.
संशोधकांच्या वार्षिक आणि सार्वकालिक कामगिरीचा विचार केला जातो. शोधनिबंधांची संख्या व गुणवत्ता, त्यांना मिळालेले संदर्भ व संशोधनाचे योगदान अशा विविध निकषांवर हे मानांकन निश्चित केले जाते. करिअर परफॉर्मन्स अर्थात सार्वकालिक कामगिरीच्या यादीत प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सुशीलकुमार जाधव, डॉ. केशव राजपुरे, निवृत्त शिक्षक डॉ. ए. व्यंकटेश्वरा राव, डॉ. सी. डी. लोखंडे, डॉ. चंद्रकांत भोसले, डॉ. संजय गोविंदवार, डॉ. विश्वास बापट यांचा समावेश आहे.