कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचरणी भाविकांकडून दानाचा ओघ कायम आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत भाविकांनी अंबाबाईला तब्बल २ कोटी १५ लाख ४८ हजार २५५ रुपयांचे दान अर्पण केले. या दानाची मोजणी १ ते ५ सप्टेंबरदरम्यान करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून ही मोजणी प्रक्रिया पार पडली.
१ सप्टेंबर रोजी झालेल्या मोजणीत ४० लाख १ हजार १९३ रुपये प्राप्त झाले. २ सप्टेंबर रोजी विविध दानपेट्यांमधून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाली. यामध्ये पेटी क्रमांक २ मधून ४९ लाख ४७ हजार २७८ रुपये, पेटी क्रमांक ६ मधून १६ लाख ५५ हजार ९२८ रुपये, पेटी क्रमांक ८ मधून ३ लाख २२ हजार ७१९ रुपये, पेटी क्रमांक ९ मधून १ लाख ८१ हजार १९५ रुपये, तर पेटी क्रमांक १० मधून १ लाख ७१ हजार ७७७ रुपये मिळाले.
३ सप्टेंबर रोजी पेटी क्रमांक ७ मधून ४० लाख ९६ हजार ७१४ रुपये, तर पेटी क्रमांक ३ मधून ७७ हजार ९५५ रुपये प्राप्त झाले. ४ सप्टेंबर रोजी पेटी क्रमांक ४ मधून ४ लाख २० हजार ८५१ रुपये, पेटी क्रमांक ५ मधून ३ लाख ३८ हजार ५८५ रुपये, तर पेटी क्रमांक १२ मधून १० लाख २७ हजार ३४९ रुपये जमा झाले. ५ सप्टेंबर रोजी मदत पेटी क्रमांक १ मधून ४३ लाख ६ हजार ८०८ रुपये दानरूपाने प्राप्त झाले. अशा प्रकारे पाच दिवस चाललेल्या मोजणी प्रक्रियेत एकूण २ कोटी १५ लाख ४८ हजार २५५ रुपयांची रक्कम दानपेट्यांमधून प्राप्त झाली.