यकृत प्रत्यारोपणासाठी 1,804 जणांची प्रतीक्षा 
कोल्हापूर

यकृत प्रत्यारोपणासाठी 1,804 जणांची प्रतीक्षा

राज्यात जनजागृतीची गरजेची; यकृत विकाराला दारू, मधुमेह, लठ्ठपणा कारणीभूत

पुढारी वृत्तसेवा
एकनाथ नाईक

कोल्हापूर ः राज्यात यकृत विकाराचे प्रमाण वाढत आहे. या रुग्णांमध्ये अनेकांना जीव वाचवण्यासाठी प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय आहे. सध्या राज्यात 1,804 रुग्ण यकृत प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत आहेत. प्रतीक्षेतील प्रत्येकामागे एक संपूर्ण कुटुंब आशेने वाट पाहत आहे.

हिपॅटायटिस बी, सी, अल्कोहोलिक लिव्हर डिसीज, नॉन -अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज यासारख्या कारणांमुळे लिव्हरचे कार्य निकामी होण्याचे प्रमाण वाढत आहे. पण, वेळेत यकृत मिळाले नसल्याने मृत्यू होतो. यकृत निकामी झाल्यानंतर रुग्णाला जिवंत राहण्यासाठी यकृत प्रत्यारोपण हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, प्रत्यारोपणासाठी योग्य यकृताची आवश्यकता असते आणि ते केवळ मृत व्यक्तीच्या अवयवदानातूनच मिळू शकते. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने सामूहिकपणे जनजागृतीचा निर्णय घेऊन ती शहरासह ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, तरच यकृत प्रत्यारोपण प्रतीक्षा यादीमधील गरजू रुग्णांना यकृत अवयव उपलब्ध होईल.

कोण करू शकतो दान?

मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे इतर अवयव योग्य स्थितीत असावेत. डॉक्टरांची विशेष समिती व्यक्तीची वैद्यकीय चाचणी करून मृत्यूची नोंद करतात. कुटुंबाची संमती मिळाल्यानंतर अवयवदान प्रक्रिया सुरू होते.

हे आहेत अडथळे

अवयवदानाबाबत अज्ञान

धार्मिक समजुती, कुटुंबाची मानसिकता नसते

रुग्णालयीन यंत्रणांचा अभाव

यकृतदानानंतरची प्रक्रिया

डॉक्टर मृत्यूची अधिकृत घोषणा करतात.

कुटुंबाची संमती घेतली जाते.

यकृत व अन्य अवयव तातडीने काढले जातात.

ग्रीन कॉरिडॉरद्वारे ते रुग्णालयात पोहोचवले जाते.

प्रत्यारोपण यशस्वी झाल्यास रुग्णाला जीवदान मिळते.

यकृत निकामी होण्याची लक्षणे

मळमळ व उलटी

थकवा आणि अशक्तपणा

पोटात सूज आणि वेदना

रक्तस्राव व जखम

खाज सुटणारी त्वचा

झोपेचा अभाव

पायांना सूज येणे

यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेतील आकडेवारी

मुंबई 785

पुणे 430

नाशिक 210

छ. संभाजीनगर 145

नागपूर 125

इतर जिल्हे 109

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT