CA Exam | कोल्हापूर विभागातील १८ विद्यार्थी झाले ‘सीए’ 
कोल्हापूर

CA Exam | कोल्हापूर विभागातील १८ विद्यार्थी झाले ‘सीए’

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस्‌ ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) मे २०२६ मध्ये झालेल्या सीए अंतिम परीक्षेचा निकाल १८ जून रोजी जाहीर झाला. यात कोल्हापूर विभागातील २७८ विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थ्यांनी यश संपादन करून चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) होण्याचा मान मिळविला. कोल्हापूर विभागात देवांश मगिया यांनी प्रथम क्रमांक मिळविला. आर्या नगराळे यांनी द्वितीय, शिवराज कवठेकर यांनी तृतीय, तर रोशन रायकर यांनी चतुर्थ क्रमांक पटकाविला.

राष्ट्रीय स्तरावर नूर सिंगला यांनी प्रथम, रितिज सराफ यांनी द्वितीय व सोहान मांजरेकर यांनी तृतीय क्रमांक मिळवून देश पातळीवरील गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. कोल्हापूर विभागातून सतलज मोरे, निखिल जोशी, आकाश गवळी, गणेश दळवी, वर्षा तांबे, प्रज्वल पाटील, आदित्य जोशी, आदित्य महाजनी, अनिरुद्ध घायदार, अस्मी दोशी, आकांक्षा संकपाळ, शिवानी स्वामी, मानसी सरनोबत आणि पौर्णिमा वारके यांनीही यश संपादन केले. सीए अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया व इतर माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ‘आयसीएआय’च्या कोल्हापूर शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर ‘आयसीएआय’चे अध्यक्ष सीए आशिष सेवेकारी यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT