Hearing-Impaired Patients | तीन वर्षांत राज्यात १ लाख ७८ हजार ९२१ कर्णबाधित रुग्ण 
कोल्हापूर

Hearing-Impaired Patients | तीन वर्षांत राज्यात १ लाख ७८ हजार ९२१ कर्णबाधित रुग्ण

नऊ हजारांहून अधिक रुग्णांवर कानाच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया; ५ हजारांहून अधिकांना श्रवणयंत्र

पुढारी वृत्तसेवा

एकनाथ नाईक

कोल्हापूर : कर्णबधिरता कोणत्याही वयोगटात होऊ शकते. जन्मजात कर्णबधिरता, गर्भावस्थेतील काही संसर्ग किंवा गुंतागुंत, जन्मजात समस्या, आनुवंशिक कारणामुळे नवजात व बालकांमध्ये श्रवणदोषाचे प्रमाण वाढत आहे. राज्यात गेल्या तीन वर्षांत १ लाख ७८ हजार ९२१ कर्णबधिर रुग्णांवर उपचार करण्यात आले. राज्य सरकारच्या एनपीपीसीडी कार्यक्रमांतर्गत कानाच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया, श्रवणयंत्र देऊन अनेक रुग्णांना उपचार दिले आहेत.

लहान मुलांमधील कानाचे संसर्ग, मधल्या कानातील आजार आणि कानाच्या पडद्याचे विकार यामुळेही ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. तरुण आणि प्रौढांमध्ये मोठ्या आवाजाचा दीर्घकाळ संपर्क, फटाके, यंत्रांचा आवाज, इअरफोनचा मोठ्या आवाजात वापर, कानाला झालेली दुखापत, कानाचे संसर्ग आणि काही औषधांचा दुष्परिणाम यामुळे श्रवणशक्ती कमी होऊ शकते. कानात टोकदार वस्तू घालू नये. कानाची समस्या असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा.

नवजात बालकांची तपासणी महत्त्वाची

कर्णबधिरतेचे लवकर निदान झाल्यास उपचार आणि पुनर्वसन अधिक परिणामकारक ठरते. महाराष्ट्राच्या राष्ट्रीय कर्णबधिरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नवजात बालकांची ओएई श्रवण तपासणी, गरजेनुसार बीईआरए चाचणी, तसेच ० ते १५ वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी केली जाते. कानाच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. गरजेनुसार कॉक्लियर इम्प्लांटसाठी उच्चस्तरीय केंद्रात संदर्भ दिला जातो.

श्रवणशक्ती कमी झालेल्या रुग्णांमध्ये तपासणीच्या निष्कर्षानुसार श्रवणयंत्राचा वापर केला जातो. गंभीर कर्णबाधिततेमध्ये पात्र रुग्णांना कॉक्लियर इम्प्लांटसाठी उच्च केंद्रात पाठविले जाते. लहान मुलांमध्ये श्रवणदोषाचे लवकर निदान करून श्रवणसहाय्य व स्पीच थेरपी सुरू केल्यास भाषिक आणि शैक्षणिक विकासाला मदत होते. श्रवणयंत्र बसविणे, पुनर्वसन आणि स्पीच थेरपी मार्गदर्शनाची सुविधा नमूद आहे.
डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, कोल्हापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT