कोल्हापूर : जागतिक पातळीवरील संशोधन कार्याचे मूल्यमापन करणाऱ्या ए.डी. सायंटिफिक इंडेक्स-2026 मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या 168 संशोधकांचा समावेश झाला आहे. यामध्ये प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांचा समावेश आहे.
निर्देशांकात शिवाजी विद्यापीठातील विविध शास्त्र शाखांतील संशोधकांचा समावेश आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे 276 संशोधक या क्रमवारीत आहेत. त्यामध्ये प्रभारी कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांचा समावेश आहे. विद्यापीठातील दहा संशोधकामध्ये डॉ. पी. एस. पाटील (भौतिकशास्त्र), डॉ. एस. पी. गोविंदवार (जैवरसायनशास्त्र), डॉ. केशव राजपुरे (सौरघट), डॉ. अण्णासाहेब मोहोळकर (ऊर्जा अभियांत्रिकी), डॉ. चंद्रकांत भोसले (भौतिकशास्त्र), डॉ. ज्योती जाधव (जैववैद्यकीय अभियांत्रिकी), डॉ. के. एम. गरडकर (रसायनशास्त्र), डॉ. संजय कोळेकर (रसायनशास्त्र), डॉ. तुकाराम डी. डोंगळे (विद्युत व इलेक्ट्रॉनिक्स), डॉ. अनिल घुले (रसायनशास्त्र). याशिवाय, डॉ. नीलेश तरवाळ, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. गोविंद कोळेकर, डॉ. सागर डेळेकर, डॉ. कैलास सोनवणे, डॉ. सुशीलकुमार जाधव, डॉ. विजया पुरी, डॉ. जॉन डिसूझा, डॉ. डी.एम. पोरे, डॉ. एस. आर. सावंत, डॉ. गजानन राशीनकर, डॉ. मानसिंग टाकळे, डॉ. राजश्री साळुंखे, डॉ. प्रमोद वासंबेकर यांच्यासह 168 संशोधकांचा समावेश आहे.
शिवाजी विद्यापीठाचे संशोधक सातत्याने ए.डी. सायंटिफिक क्रमवारीत झळकत आहेत. शिवाय या यादीमधील त्यांची संख्या वर्षागणिक वाढते आहे. विद्यापीठातील संशोधकांच्या यशाची ही वाढती कमान अभिमानास्पद व नवसंशोधक विद्यार्थ्यांसाठी प्रेरक आहे. हे सातत्य कायम ठेवण्याबरोबरच अधिकाधिक दर्जेदार संशोधन करण्याकडे हे संशोधक वाटचाल राखतील.- डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी कुलगुरू.