कोल्हापूर

कोल्हापुरातील नशेच्या बाजाराचा पर्दाफाश; १५ लाखांचे ड्रग्ज जप्त, मनीष नगोरीच्या मुसक्या आवळल्या

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच कोल्हापूर पोलिसांनी तस्कर मनीष नागोरी आणि समीर उर्फ साजन उर्फ पाबलो गुलाब शेख यांना बेड्या ठोकल्‍या आहेत. १५ लाख ५१ हजार रुपये किंमतीचा बारा ग्रॅम एमडी ड्रग्जचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.

ऐन गणेशोत्सव काळात अंमली साठा पोलिसांच्या हाताला लागल्याने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गणेशोत्सव काळात पुणे जिल्ह्यातील गुन्हेगार आणि 23 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या समीर उर्फ साजन शेख हा कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने वाशी पिरवाडी सातारा येथून त्यास जेरबंद करण्यात आले.

चौकशीत हा साठा कुख्यात तस्कर मनीष नागोरी यांनी दिला असल्याची माहिती पुढे आली. पथकाने आज (शनिवार) पहाटे मोरवाडी तालुका करवीर येथे छापा टाकून नागोरी याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

जेरबंद केलेल्या आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी बजावले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT