कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथील मृत गुन्हेगार पिंटू मिसाळ याच्या घरी सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी सोमवारी सायंकाळी छापा टाकला. यामध्ये १५ जणांना अटक करून ८ दुचाकी, १० मोबाईल, रोख ४० हजार असा सुमारे ७ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ओंकार गणेश मिसाळ (वय २५), अभिषेक श्रीमंत इलगार (२२), गुरुदास रामदास पुरेकर (२६), सुशांत करवीर भोई (३२ रा.), अनिकेत अर्जुन लोखंडे (२७), श्रेयस राजेंद्र चव्हाण (२६), ऋषीकेश जयराम खोंदल (२६ ), सागर रंगराव काशीद (४१), प्रभाकर शंकर माने (६५), आदित्य संजय चौगुले (२१), पवन विलास चव्हाण (२६), आदित्य काशिनाथ सोनवणे (२७, सर्व रा. लक्षतीर्थ वसाहत), ऋषभ दिगंबर पावसकर (३१, रा. सरनाईक गल्ली, शिवाजी पेठ), अनिकेत सतीश माने (२५, रा. शुक्रवार पेठ, जोशी गल्ली), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
बहुतांशी तरुणांचा समावेश
सोमवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये १५ पैकी १२ आरोपी हे २० ते २६ वयोगटातील आहेत. केवळ दोघे जणेच ४० आणि ६० वर्षांचे आहेत. पोलिस निरीक्षक श्रीराम कनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार प्रितम मिठारी, मंगेश माने, तानाजी दावणे, रोहित ठोंबरे, किशोर पोवार यांनी ही कारवाई केली.