बांबवडे : पुढारी वृत्तसेवा
वारणा रेठरे ता. शाहूवाडी येथे प्रवाहित विजेची तार ऊसाच्या शेतात पडल्याने सुमारे पंधरा एकर ऊस जळून खाक झाला आहे. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रेठरे वारणा नदीकाठावर हे ऊसाचे क्षेत्र आहे. उच्च प्रवाहाची विजेची तार ऊसाच्या शेतात पडली आणि ही आग लागली.
या आगीत गावातील विकास पाटील, कॄष्णात पाटील, आनंदा पाटील, जालिंदर पाटील, भगवान पाटील, रंगराव पाटील, अशोक पाटील, राजाराम पाटील, महादेव पाटील, बाळू पाटील, या शेतकऱ्यांच्या मालकीचे हे उसाचे श्रेत्र आहे. या आगीत या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.