विशाळगड : सुभाष पाटील
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा आज (२१ फेब्रुवारी) पासून सुरू झाली. शाहूवाडीत ५ केंद्रांवर १,४८९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा 'कॉपीमुक्त' ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, परीक्षेतील गैरप्रकारांना लगाम बसावा, यासाठी यंदाही ठोस पावले उचलली आहेत. प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर घेऊन येणाऱ्या ‘रनर’वर जबाबदारी दिली आहे. प्रश्नपत्रिका आणणाऱ्या ‘रनर’वर जबाबदारी दिली असून, प्रत्येक केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी व नंतर पथक नेमले आहे.
महसूल, पोलिस व शिक्षण विभागाची विशेष पथके कार्यरत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करूनच वर्गात सोडले जाणार आहे. विद्यार्थी व शिक्षकांना परीक्षा केंद्रावर मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच पाण्याची बाटली नेण्यासही मनाई आहे. परीक्षेसाठी विद्यार्थी अर्धा तास आधी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षेच्या नियोजनासाठी केंद्रसंचालकांची बैठक घेण्यात आली असून, आवश्यक साहित्य केंद्रांवर पोहोचवले आह
बोर्डाचे कॉपीमुक्त अभियान स्वागतार्ह आहे. विद्यार्थ्यांनी तणावपूर्ण व भयमुक्त वातावरणात आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. कोणताही अनुसुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. पाच केंद्रातील केंद्रसंचालकांनी परीक्षा सुरळीत पार पाडावी. दहावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.डॉ. विश्वास सुतार, गटशिक्षणाधिकारी, शाहूवाडी
* परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावर दोन, याप्रमाणे असणार १० बैठे पथके
* संवेदनशील परीक्षा केंद्रांना अचानक भेटी
* पेपरसाठी विद्यार्थ्यांना दहा मिनिटांचा शेवटी वाढीव वेळ
* एकाच वर्गातील सामुहिक कॉपी प्रकारांवरही विशेष वॉच
* परीक्षा केंद्राच्या १०० मीटर अंतरातील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग, संगणक सेंटर, इंटरनेट कॅफे बंद राहणार
केंद्र विद्यार्थी
१) शाहू हायस्कुल शाहूवाडी ३९६
२) मलकापूर हायस्कूल मलकापूर २९०
३) महात्मा गांधी विद्यालय, बांबवडे २९६
४) कापशी २६६
५) कै सुकुमार नागेशकर हाय. वारूळ २४१
एकूण १४८९