14 Tola Gold Theft | जुगारासाठी लांबवले १४ तोळ्यांचे दागिने 
कोल्हापूर

14 Tola Gold Theft | जुगारासाठी लांबवले १४ तोळ्यांचे दागिने

घरातच डल्ला मारणाऱ्यास करवीर पोलिसांकडून दागिन्यांसह अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : घरातील १४ तोळे दागिने चोरी करून त्यातून आलेल्या लाखो रुपयांची गोव्यातील कसिनो आणि जुगारात उधळपट्टी केल्याप्रकरणी तरुणास करवीर पोलिसांनी अटक केली. आतिश संजय चौगुले (वय २६, रा. सूर्यनगरी, हणमंतवाडी रोड, ता. करवीर) असे त्याचे नाव असून ऑक्टोबर २०२५ ते जुलै २०२६ दरम्यान चोरी केल्याची कबुली त्याने दिली.

फिर्यादी संजय चौगुले (रा. शिंगणापूर) यांच्या घरातील १४ तोळे दागिने चोरीस गेल्याचे रविवारी (दि. ३०) निदर्शनास आले. चोरटा माहीतगार असल्‍याचा संशय व्‍यक्‍त होत असतानाच संजय चौगुले यांचा मुलगा कामधंदा न करता उधळपट्टी करत असल्याचे कळल्‍यावर पोलिसांनी चौकशी केली. याआधी तो लक्षतीर्थ येथील जुगार अड्ड्यावरील कारवाईतही सापडला होता. करवीर पोलिसांनी चौकशी केल्‍यावर त्याने चोरीची कबुली दिली. मुलानेच दागिने चोरल्याचे समजताच वडिलांना धक्का बसला.

१४ तोळे दागिने हस्तगत

सराफांना विकलेला लक्ष्मीहार, मंगळसूत्र, ६ अंगठ्या, ४ सोनसाखळ्या, कर्णफुले, कानातील रिंगा असे दागिने परत मिळविण्यात पोलिसांना यश आले. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

गोव्याच्या कसिनोत उधळपट्टी

आतिश गोव्यात जाऊन पैशाची उधळपट्टी करायचा. तो जुगार व कसिनोच्या नादात अडकल्याचे मित्रांचे म्‍हणणे आहे. चौकशीत त्याने पैसे जुगारात हरल्याचे मान्‍य केले.

टप्प्याटप्‍प्याने दागिन्यांची चोरी

आतिश हा घरात संशय येऊ नये म्हणून ठरावीक अंतराने दागिन्यांची चोरी करत होता. सराफांना गाठून तो दागिने वितळून त्यातून उधळपट्टी करत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT