कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी अतिरिक्त सरकारी वकील अपिल शाखा (रिट सेल) अॅड. प्रसन्नकुमार प्रियभूषण काकडे यांच्यासह 14 सरकारी वकिलांची शुक्रवारी प्रतिनियुक्ती करण्यात आली. 18 ऑगस्टपासून सर्किट बेंचच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती यांच्या आदेशानुसार उपविधी सल्लागार-नि-उपसचिव विलास खांडबहाले यांनी सरकारी वकिलांच्या नियुक्तीचे परिपत्रक जारी केले.
अॅड. प्रियभूषण काकडे यांच्यासह सहायक सरकारी वकील अपिल शाखा (रिट सेल) अॅड. विकास महादेव माळी, सहायक सरकारी वकील, अपील शाखा (रिट सेल) अॅड. संजय धुंडीराज रायरीकर, सहायक सरकारी वकील अपिल शाखा (रिट सेल) अॅड. तेजस जयप्रकाश कापरे, सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अपिल शाखा अॅड. श्रीराम शांताराम चौधरी, सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अपिल शाखा अॅड. श्रीकांत हनमंतराव यादव, सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अपिल शाखा अॅड. आनंद सुभाष शाळगावकर, सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अपिल शाखा अॅड. नितीन बाबगोंडा पाटील, सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अपिल शाखा अॅड. पंकज पोपटराव देवकर, सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अपिल शाखा अॅड. अविनाश अशोक नाईक, सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. अश्विनी अशोक टाकळकर, सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अपिल शाखा अॅड. प्रियांका सुभाष राणे, सहायक सरकारी वकिल व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. शुभांगी नितीन देशमुख यांचा कोल्हापूर सर्किट बेंचसाठी प्रतिनियुक्ती झालेल्यांत समावेश आहे.
कोल्हापूर सर्किट बेंचसाठी प्रतिनियुक्त झालेले सरकारी वकील मुंबई उच्च न्यायालय व संभाजीनगर खंडपीठ येथे कार्यरत आहेत. संबंधित सरकारी वकिलांची तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेशापर्यंत प्रतिनियुक्ती करण्यात येत असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालय येथील पदाचा कार्यभार सांभाळून कोल्हापूर सर्किट बेंच येथील कार्यभार पुढील आदेशापर्यंत सांभाळावा, असे परिपत्रकात म्हटले आहे.