कोल्हापूर : मार्केट यार्ड, राजीव गांधी वसाहत येथील खोलीमध्ये सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांच्या पथकाने छापा टाकून 14 जणांना अटक केली. रोख रक्कम, दुचाकी, मोबाईल असा 2 लाख 86 हजार 740 रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला.
सतीश बाजीराव जाधव (39, रा. राजीव गांधी वसाहत), श्रीशैल शरणाप्पा आडके (50, उचगाव, ता. करवीर), चेतन बंडू कुराडे (35, राजीव गांधी वसाहत), शिवकुमार चंद्रशेखर इंडी (33, बाबानगर, उचगाव), मल्लिकार्जुन बसलिंगाप्पा रामपूर (46, उचगाव), बसवराज शिवराय नायकवडी (39, टेंबलाईवाडी, कोल्हापूर), मुजाहिद गौसलाजम चमनशेख (38, मदिना कॉलनी, उचगाव), चिदानंद विरूपक्ष बहिरजी (69, टेंबलाईवाडी), अमोल रमेश गोंधळी (41, टेंबलाईवाडी, कोल्हापूर), मल्लिकार्जुन शरणाप्पा रायगोंडा (55, उचगाव, करवीर), आसगरअल्ली ताजुद्दीन शेख (37, उचगाव, करवीर), धर्मा दौलू कांबळे (66, राजीव गांधी वसाहत), मुसद्दीक मोहम्मदहनिफ मुजावर (31, उचगाव), उमेश बाजीराव जाधव (38, राजीव गांधी वसाहत, कोल्हापूर) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
संशयितांविरुद्ध राहुल यशवंत पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयितांकडून रोख रक्कम, तीन दुचाकी, 14 मोबाईलसह जुगाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.