कोल्हापूर : येथील महावीर महाविद्यालयात १२ वी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना गैरमार्ग अवलंबनार नाही अशी प्रतिज्ञा देण्यात आली. pudhari photo
कोल्हापूर

Kolhapur: १२ वी बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी घेतली कॉपी न करण्याची शपथ

12th board: विद्यार्थ्यांच्या करिअरला वळण देणारी परीक्षा

पुढारी वृत्तसेवा

कासारवाडी : फेब्रुवारी-मार्च २०२५ बारावी बोर्ड परीक्षा मंगळवारपासून इंग्रजी विषयाच्या पेपरने सुरू झाली. या परीक्षेत कॉपीमुक्त अभियान राबवताना गैर मार्गाचा अवलंब करणार नाही अशा आशयाची शपथ बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना देण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या करिअरला वळण देणारी परीक्षा म्हणून बारावी बोर्ड परीक्षेचे महत्त्व आहे. या परीक्षेच्या गुणांवर पुढचे करिअर ठरवले जाते. यासाठी या परीक्षेत पास होण्यासाठी व चांगले गुणांक मिळवण्यासाठी अनेक विद्यार्थी गैरमार्गाचा वापर करतात. दरवर्षी असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. ग्रामीण भागातील काही परीक्षा केंद्र तर यासाठी चांगलीच नावाजलेली आहेत.

चालू शैक्षणिक वर्षातील परीक्षेत कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी याबाबत दक्षता घेतली आहे. यासाठी भरारी पथक, कॅमेरे, कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर व त्यांना सहकार्य करणाऱ्याच्यावर गुन्हे दाखल करणे. अशा कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. पण विद्यार्थ्यांचे मन परिवर्तन होण्यासाठी त्यांना परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटे अगोदर परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब करणार नाही अशा आशयाची शपथ केंद्र प्रमुख व शाळा प्रमुखांनी शाळा स्तरावर दिली गेली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT