12 families migrated from Alas river bank
आलास नदीकाठावरील १२ कुटुंबे स्थलांतरित Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur Flood News : आलास नदीकाठावरील १२ कुटुंबे स्थलांतरित

पुढारी वृत्तसेवा

कवठेगुलंद ; पुढारी वृत्तसेवा

आलास ता. शिरोळ येथेली पूर पट्ट्यातील नदीकाठी वास्तव्यास असणाऱ्या 12 कुटुंबातील लोकांनी जनावरांसह स्वतःहून स्थलांतर केले. यापैकी अनेक कुटुंबे मित्र परिवार, पै पाहुणे तसेच अन्य ठिकाणी असलेल्या स्वतःच्या घरात रहावयास गेल्‍याचे तलाठी शिवप्रसाद चौगुले यांनी सांगितले. पाणी पातळी हळुवार वाढत असल्याने अजुन काही कुटुंबे स्थलांतरीत होण्याची शक्यता आहे. (Kolhapur Flood News)

सकाळपासून नदी काठावरील लोक स्थलांतरित होत आहेत. ग्रामपंचायत तसेच प्रशासनाने येथील माळभाग येथील लाल बहादूर शास्त्री हायस्कूल कवठेगुलंद या शाळेत राहण्याची व जनावरे बांधण्याची सोया केली जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे जसजसे पाणी पातळी वाढत आहे, तसतशी अनेक कुटुंबे आपल्या साहित्यासह जनावरांना घेऊन स्थलांतर करत आहेत. (Kolhapur Flood News)

पाणी पातळी हळुवारपणे वाढत असल्याने काहीजण सर्व साहित्य वाहनांमध्ये ठेऊन पाणी पातळी किती वाढते पाहून स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहेत. प्रशासन मात्र पाणी वाढण्याची वाट न बघता तात्काळ स्थलांतरित व्हा या भूमिकेत आहे. यासाठी सरपंच सचिन दानोळे, उपसरपंच सोनाली कोळींसह सर्व सदस्य ग्रा.प.कर्मचारी पस्‍थितीवर लक्ष ठेवून आहेत. (Kolhapur Flood News)

SCROLL FOR NEXT