कोल्हापूर : अकरावी केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सोमवारपासून (दि. 19) https:/// mahafyjcamissions.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नावनोंदणी करून आवश्यक कागदपत्रांसह प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. प्रवेश अर्ज प्रक्रिया 28 मेपर्यंत चालणार आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 325 महाविद्यालयांतील सुमारे 60 हजार प्रवेश जागा उपलब्ध आहेत. महाविद्यालयांच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाली असून जिल्ह्यातील 326 कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. 19 ते 28 मेदरम्यान विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रोफाईल तयार करून प्रवेशासाठी प्राधान्यक्रम द्यावयाचा आहे. त्यानंतर व्यवस्थापन कोटा व अल्पसंख्याक व इनहाऊस कोट्यातील प्रवेश निश्चिती होणार आहे. 28 मे रोजी नावनोंदणी पूर्ण झाल्यावर चार फेर्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया होईल. अर्ज व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. गुणवत्ता यादीनुसार मिळालेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागेल, अशी माहिती कोल्हापूर विभागीय प्रभारी शिक्षण उपसंचालक स्मिता गौड यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी सराव सत्र : 19 ते 20 मे
प्रत्यक्ष नोंदणी व पसंतीक्रम नोंदविणे : 21 ते 28 मे
1 ते 10 पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती : कोटा (व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्याक)
तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर : 30 मे
हरकती व दुरुस्ती प्रक्रिया (लॉगीन द्वारे) : 30 मे 1 जून
अंतिम गुणवत्ता यादी जाहीर : 3 जून
गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप (शून्य फेरी) : 5 जून
वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी पोर्टलवर : 6 जून
निवडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड व प्रत्यक्ष तपासणी : 6 ते 12 जून
पहिली पसंती मिळाल्यास प्रवेश घेणे अनिवार्य
दुसर्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर : 14 जून